Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल व्हावा याच भावनेतून जैन इरिगेशनचे कार्य – अशोक जैन

najarkaid by najarkaid
October 17, 2022
in राज्य
0
शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल व्हावा याच भावनेतून  जैन इरिगेशनचे कार्य – अशोक जैन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनने कायमच शेत, शेती व शेतकरी हेच केंद्रबिंदू मानले आहे. कंपनीद्वारे विविध प्रयोग करुन शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडावा, सर्वांगिण विकासातून आर्थिक समृद्धी साधता यावी यासाठीच जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ही कंपनी कायमच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

मुंबई येथील जगप्रसिद्ध हाॅटेल ताजमहाल पॅलेस, गेट वे ऑफ इंडिया येथे कंपनीच्या वतीने आयोजित वितरक परिषदेत अशोक जैन बोलत होते. दोन दिवसीय वितरक परिषदेस महाराष्ट्रातून 171 निमंत्रित वितरक सहभागी झाले होते. अशोक जैन यांनी सांगितले की, जैन इरिगेशनची कायम शेतकऱ्यांशीच बांधिलकी राहणार आहे, जैन इरिगेशनचे प्रत्येक उत्पादन हे शेतकऱ्यांच्या विकासाला पूरक ठरेल असेच असेल. यातून बळिराजाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या परिषदेला जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, विपणन प्रमुख अभय जैन, अथांग जैन, अभेद्द जैन, स्टेट हेड एस. एन. पाटील, केळीतज्ज्ञ के. बी. पाटील व कंपनीचे महाराष्ट्रातील सर्व विभागीय व्यवस्थापक उपस्थित होते.

परिषदेच्या सुरूवातीला वितरकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी कंपनीच्या वाटचाली बाबतचे सविस्तर सादरीकरण केले. एस. एन. पाटील यांनी कंपनीच्या विविध उत्पादनांचे सादरीकरण केेले, तर के. बी. पाटील यांनी ऊती संवर्धित संबंधित रोपाविषयी मार्गदर्शन केले.

कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांचे जे आर डी टाटा हे आदर्श होते, त्यांची तत्वे आणि मूल्य त्यांनी कायमच अंगीकारली होती. आपण सर्वजण समाजाचे विश्वस्त असल्याने आपल्या मिळकतीच्या अधिक पटीने समाजाला देण्याची भावना ठेऊनच जैन इरिगेशनचे कार्य अविरत सुरू आहे. जैन इरिगेशनने शेतकऱ्यांच्या हितासाठी आतापर्यंत १२ हजार कोटींची गुंतवणूक केली असून याद्वारे ८० लाख शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी अनिल जैन यांनी जगभरातील पर्यावरण बदलाची व त्याचा शेतीवर होणारा परिणाम याची सविस्तर माहिती विषद केली.

या परिषदेत कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनीही मनोगत व्यक्त करून वितरकांच्या विविध विषयांवर व बाजार पेठेत आणि व्यवसायात असणारी आव्हाने, होत असलेले बदल, अनुषंघाने व्यापाराचे परिवर्तन व धोरणनीती कशी असावी याविषयी मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय परिषदेत वितरकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच वितरकांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल ६० वितरकांना ‘ग्रोथ ड्रायव्हर, बीयांड ग्रेटफुल, सैल्युट टू लाॅयल्टी’ या पुरस्कारांनी तसेच कंपनीच्या विविध उत्पादनांची विक्रमी विक्री करण्याचा ६ वितरकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वितरकांच्यावतीने व्यवस्थापनाचा देखील सन्मान करण्यात आला. वितरक परिषेदेचे सूत्रसंचालन के. बी. पाटील यांनी केले. आभार अतुल जैन यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलांसाठी महत्वाची बातमी ; राज्य शासनाकडून ‘या’ १० आरोग्य तपासण्या मोफत, योजनेचा लाभ घ्या…

Next Post

धावत्या ट्रेनमधून प्रवाशाने तरुणाला बाहेर फेकलं ; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
धावत्या ट्रेनमधून प्रवाशाने तरुणाला बाहेर फेकलं ; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

धावत्या ट्रेनमधून प्रवाशाने तरुणाला बाहेर फेकलं ; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us