Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील सत्तापेच रविवारपर्यंत सुटणार?

najarkaid by najarkaid
November 14, 2019
in राज्य, राजकारण
0
महाराष्ट्रातील सत्तापेच रविवारपर्यंत सुटणार?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी राज्यातील सत्तापेच लवकरात लवकर सोडवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी  यांची भेट घेणार असून या भेटीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या रविवारी १७ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सत्तापेच संपुष्टात येणार असल्याचं सांगण्यात येतं. 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी दोन्ही काँग्रेसची काल बैठकही झाली. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा ठरल्यानंतर त्या मसुद्यावर शिवसेनेसोबत चर्चा करून काही गोष्टींचा त्यात समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर सत्तेतील पदांच्या वाटपाचं सूत्र ठरवण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असून त्यांच्याशी राज्यातील परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. त्यानंतरच राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये रविवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्यातील आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. ‘मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. काँग्रेसला सत्तेत यायचंच नाही, तर मागण्या कुठून समोर यायला लागल्या? मला नाही वाटत. त्यांना तर बाहेरुन पाठिंबा द्यायचा आहे, आमची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत यावं. पद, खाती याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या दिवसात कोणताही वाद होणार नाही. आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. मलिक यांच्या वक्तव्यामुळे राज्यात शिवसेनेचा पाच वर्षासाठी मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. तसेच राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असल्याचंही स्पष्ट झाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा

Next Post

अग्रवाल महिला संमेलनातर्फे जिल्हास्तरीय अधिवेशनाचे रविवारी आयोजन 

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अग्रवाल महिला संमेलनातर्फे जिल्हास्तरीय अधिवेशनाचे रविवारी आयोजन 

अग्रवाल महिला संमेलनातर्फे जिल्हास्तरीय अधिवेशनाचे रविवारी आयोजन 

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us