Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रपती राजवटीची शिफारस? उठल्या वावड्या!

najarkaid by najarkaid
November 12, 2019
in राज्य, राजकारण
0
राष्ट्रपती राजवटीची शिफारस? उठल्या वावड्या!
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: राज्याचे राज्यपाल कोश्यारी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज रात्री ८.३० ची वेळ दिली असताना राज्यपालांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस केल्याचे वृत्त टाइम्स नाऊ आणि दूरदर्शन वृत्तवाहिनीने दिले आणि राजकीय वर्तुळात तसेच टीव्ही वृत्तवाहिन्यांवर मोठी चर्चा सुरू झाली. राज्यपाल संध्याकाळपर्यंत स्थिर सरकार कुणी स्थापन करण्याच्या स्थितीत आहे का, हे पाहिल्यानंतर राज्यपाल हा राष्ट्रपती राजवटीबाबत निश्चित निर्णय घेऊ शकतील, असेही एक मत चर्चिले जात आहे. दरम्यान, जर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा केला नाही, तर राज्यपाल चौथा सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करणार की नाही, हा प्रश्नही राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. दरम्यान, राज्यपालांनी अशा प्रकारची कोणतीही शिफारस राज्यपालांनी केली नसल्याचे राजभवनाच्या प्रवक्त्यानी स्पष्ट केले. त्यांनंतर या चर्चेवर पडदा पडला. 

पंतप्रधान मोदींनी तातडीने बोलावली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस केली असल्याने यावर निर्णय घेण्यासाठीच मोदी यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावल्याचे सांगितले जात आहे. मोदी ब्राझिलच्या दौऱ्यावर जात असल्याने ही बैठक तातडीने बोलावली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीवर निर्णय घेण्यासाठीच ही बैठक बोलावली का, या वृत्ताला कुणीही अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

शिवसेना कोर्टात जाण्याची शक्यता

दरम्यान, राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली असल्यास हा शिवसेनेवर अन्याय असेल अशी शिवसेनेची भावना असल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर झळकले. म्हणूनच न्याय मिळावा यासाठी शिवसेना न्यायालयात जाणार असल्याचे वृत्त प्रसारित झालेले पाहायला मिळत आहे.

‘काँग्रेसला संधी द्यायला हवी’

जर राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी काँग्रेसला चौथा सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला निमंत्रण न देता केंद्रीय गृहमंत्रालयाकडे राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली असेल, तर हा आमच्यावर अन्याय ठरेल. अशा प्रकारची शिफारस हा पक्षपातीपणाच असेल, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रपती राजवट लागू झाली तरीही सेनेला संधी

Next Post

आता आघाडीत जुंपली; दिरंगाईला काँग्रेस जबाबदारः राष्ट्रवादी

Related Posts

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Next Post
आता आघाडीत जुंपली; दिरंगाईला काँग्रेस जबाबदारः राष्ट्रवादी

आता आघाडीत जुंपली; दिरंगाईला काँग्रेस जबाबदारः राष्ट्रवादी

ताज्या बातम्या

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us