घरी बसून मतदान – झारखंडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यांना घराशेजारी ईव्हीएमवर जाऊन मतदान करायचे नसेल तर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे.
४१ जागांसाठी बहुमत – झारखंड विधानसभेची संख्या ८१ असून राजकीय पक्षांना बहुमतासाठी ४१ चा आकडा पार करावा लागणार आहे. सध्या झारखंडमध्ये भाजब आणि ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनची सत्ता आहे. मात्र यावेळी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी कसरत करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपला ३७ जागा मिळाल्या होत्या तर एजेएसयूला ५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.
नवी दिल्ली- झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या ठिकाणी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये ३० नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी, ७ डिसेंबर रोजी दुसऱ्या, १२ डिसेंबर रोजी तिसऱ्या, १६ डिसेंबर रोजी चौथ्या आणि २० डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आल्याने राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी आज जाहीर केलं.














