Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

होय, भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावलेली- अंबानी

najarkaid live by najarkaid live
October 30, 2019
in राज्य
0
होय, भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावलेली- अंबानी
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: देशात आर्थिक मंदी असल्याचं या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं असतानाच, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यांनी ही परिस्थिती तात्पुरती असल्याचं सांगतानाच, सरकारने अलीकडेच उचललेल्या पावलांमुळं पुढील तिमाहीत अर्थव्यवस्थेत तेजी येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सौदी अरेबियातील रियाधमध्ये ’फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह’मध्ये उपस्थितांना संबोधित करताना मुकेश अंबानी यांनी भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावलेली असल्याचं म्हटलं आहे. देशातील अर्थिक क्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपाची मंदी आहे. मात्र, सरकारने अलीकडेच जी पावलं उचलली आहेत, त्यामुळं पुढील तिमाहीत अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजी येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत रियाधमध्ये आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. यात मुकेश अंबानी यांच्यासह भारतातील अनेक दिग्गज उद्योगपती उपस्थित होते. मुकेश अंबानी यांनी मंगळवारी या कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित केले. ’भारतीय अर्थव्यवस्थेत थोडी मंदी निश्चितच आहे. मात्र ती तात्पुरत्या स्वरुपाची आहे असं मला वाटतं. गेल्या काही महिन्यांत सरकारने सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच होईल. पुढील तिमाहीत परिस्थिती संपूर्णपणे बदलेल,’ असे अंबानी यावेळी म्हणाले.
यावेळी अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सौदीचे किंग सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद आणि त्यांचे पुत्र प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीज यांच्या हवाल्यानं सांगितलं की, ’या नेत्यांचं नेतृत्व गती देणारे आहे. दोन्ही देशांचं नेतृत्व जगात सर्वोत्कृष्ट आहे. सौदी अरेबियाने गेल्या दोन तीन वर्षांत जबरदस्त बदल पाहिले आहेत.’ भारताच्या विकास दरात गेल्या पाच महिन्यांपासून घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. एप्रिल-जून या तिमाहीत विकास दर पाच टक्क्यांपर्यंत आला आहे. वर्षभरापूर्वी तो आठ टक्क्यांपर्यंत होता. हा 2013 नंतरचा सर्वात कमी दर आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अलीकडेच ठोस पावले उचलली आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. कंपनी करात घट केल्याची घोषणा केली आहे, तसंच अनेक सरचार्ज हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देवेंद्र फडणवीस भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

Next Post

भाजप हायकमांड उद्धव ठाकरेंशी करणार चर्चा: गिरीश महाजन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भाजप हायकमांड उद्धव ठाकरेंशी करणार चर्चा: गिरीश महाजन

भाजप हायकमांड उद्धव ठाकरेंशी करणार चर्चा: गिरीश महाजन

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us