नागपूर : नागपूरमध्ये एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्यावसायिकाने स्वतः तर आत्महत्या केलीच. पण आपल्या पत्नी आणि मुलालाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं पत्नी आणि मुलगा यातून थोडक्यात बचावले. पण तेही जखमी झाले. मात्र व्यावसायिक कारसोबत जिवंत जळाला.
ही घटना नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील खापरी पुनर्वसन परिसरात घडली. या घटनेनं मंगळवारी एकच खळबळ उडाली.
63 वर्षांचे रामराज गोपाळकृष्ण भट हे जयताळामध्ये राहत होते. त्यांचा नट बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. मात्र कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांपासून ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यांचा मुलगा इंजिनिअर होता. पण तो कुठेही काम करत नव्हता. दरम्यान, आर्थिक चणचणीतून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. धक्कादायक बाब म्हणजे रामराज गोपाळकृष्ण भट यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला जेवणाच्या बाहाण्याचे बाहेर घेऊन जाण्याचा प्लान केला. सामूहिक आत्महत्येसाठी त्यांनी पत्नी आणि मुलाला सोबत घेऊ गेले होते.
हे देखील वाचा :
शिंदे गटाच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण पुढे ढकललं
अमिषा पटेलविरोधात कोर्टाकडून वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
खळबळजनक ! शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी, चौघांना अटक
दिशा पटानीने लावला बोल्डनेसचा तडका, काळ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दिसली खूपच ग्लॅमरस
जेवणाचा बहाणा, आत्महत्येचा प्लान
वर्धा मार्गावरील हॉटेलात जेवण करु, असा बहाणा करत त्यांनी पत्नी आणि मुलाला सोबत घेतलं. दुपारी एकच्या सुमारास त्यांनी खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवली. भट यांनी पत्नी आणि मुलाला विष दिलं. दोघांनाही संशय आला. नेमकं काय सुरु आहे, हे त्यांना कळायला मार्ग नव्हता. अखेर दोघांनीही रामराज भट यांनी दिलेली गोष्ट पिण्यास नकार दिली. शेवट भट यांनी स्वतःसह पत्नी आणि मुलावरही एक विशिष्ट द्रव पदार्थ फवारला. त्या दोघांनाही काही कळायच्या आतच कारही रामराज यांनी पेटवून दिली.