नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. 11 लाख रुपये घेऊन कार्यक्रमाला न पोहोचल्याचा आरोप अमिषावर आहे. हे प्रकरण पाच वर्षे जुनं आहे. कोर्टाच्या सुनावणीवेळी उपस्थित न राहिल्याने अमिषाच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला. त्यानुसार अमिषाला 20 ऑगस्ट रोजी ACJM-5 न्यायालयात (Court) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, अमिषा पटेलने एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 11 लाख रुपये ॲडव्हान्स घेतले होते. मात्र ऐनवेळी ती कार्यक्रमाला हजर राहिली नाही. अमिषा एका लग्न समारंभात सहभागी होणार होती. त्यासाठी तिने आगाऊ रक्कम घेतली होती.
काय आहे प्रकरण?
कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या इव्हेंट कंपनीचे व्यवस्थापक पवन वर्मा यांनी 2017 मध्ये अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी मुरादाबादमध्ये खटला सुरू होता. अमिषाविरुद्ध कलम 120-बी, 406, 504 आणि 506 अंतर्गत खटला सुरू आहे. तक्रारदाराच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने अमिषा आणि तिच्या साथीदारांना समन्स पाठवले आहेत.
हे देखील वाचा :
खळबळजनक ! शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी, चौघांना अटक
दिशा पटानीने लावला बोल्डनेसचा तडका, काळ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दिसली खूपच ग्लॅमरस
मोठी बातमी ! सुट्या वस्तूंवरील पाच टक्के जीएसटी मागे, पण..
अरे बापरे.. खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकाला डंपरने चिरडले
अजामीनपात्र वॉरंट जारी केलं जाऊ शकतं
वॉरंटनंतरही अमिषा कोणत्याही वैध कारणाशिवाय कोर्टात हजर राहिली नाही, तर तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केलं जाऊ शकतं, असं समन्समध्ये म्हटलं आहे. मंगळवारी कोर्टाने अमिषाविरोधात वॉरंट जारी केलं आहे. अमिषा पटेल कायदेशीर अडचणीत सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती चेक बाऊन्सच्या प्रकरणांमुळे वादात सापडली होती.