Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत कोसळधार ; मध्य-पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Editorial Team by Editorial Team
July 5, 2022
in राज्य
0
मुंबईत कोसळधार ; मध्य-पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
ADVERTISEMENT
Spread the love

मंत्रालय प्रतिनिधी चेतन महाजन (कल्याण) : मुंबई शहर व उपनगरांत सोमवारी दुपारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला आणि सलग दोन ते तीन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. किंग्ज सर्कल, हिंदमाता, सायन, वडाळा, चेंबूर आदी सखल भागात पाणी तुंबले. जोरदार पावसामुळे वाहनांचा वेगही मंदावला त्यामुळे सर्व उपनगरांत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. रेल्वे मार्गात पाणी तुंबण्याची भीती असल्यामुळे चाकरमानीही घराकडे लवकर निघाल्याने सीएसएमटी, चर्चगेट, दादर, स्टेशनवर मोठी गर्दी उसळली.

लोकलचा वेग मंदावला

संध्याकाळनंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने लोकलचा वेग मंदावला. सीएसएमटी ते कल्याण, पनवेल आणि चर्चगेट ते विरार लोकलचे वेळापत्रक कोलमडले.त्यामुळे संध्याकाळी घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. धुवाधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मध्य रेल्वेवरील लोकल चालवताना मोटरमनला अडचणी येऊ लागल्या. परिणामी लोकल वीस ते तीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ विलंबाने धावू लागल्या. त्यातच कुर्ला ते विद्याविहार, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, पनवेल ते कर्जत या पट्टयात काही प्रमाणात रुळावर पाणीही साचल्याने लोकलचा वेग कमी करण्यात आला. चर्चगेट ते विरार दरम्यानच्याही लोकल उशिराने धावू लागल्या. हार्बर आणि ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बरवरील लोकलही उशिरानेे धावल्या.

पावसामुळे शहर भागात 2 ठिकाणी, पश्चिम उपनगरांत 7 ठिकाणी तर पूर्व उपनगरांत 5 ठिकाणी अशी 14 झाडे पडली. 5 ठिकाणी घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. कुर्ला ( प.), संतोषी माता नगर, होमगार्ड कार्यालय येथे संरक्षक भिंत कोसळून 5 घरांचे नुकसान झाले. 5 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाले नाही. सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत शहरात – 21 मिमी, पूर्व उपनगरांत – 17 मिमी तर पश्चिम उपनगरांत – 25 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. वरळी, प्रभादेवी येथे 22 मिमी, परळ 20 मिमी, मुंबई सेंट्रल हाजीअली 19 मिमी, मलबार हिल 17 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

हे पण वाचा :

पुढचे 4 दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

राजकारणात आणखी एक ट्विस्ट ; शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना सोडून इतर १४ आमदारांना नोटीस

सुनेच्या जाचाला कंटाळून सासूने घर सोडलं ; चिठ्ठीतून मोठा धक्कादायक उलगडा

विधिमंडळ अधिवेशन ; मुख्यमंत्री शिंदेकडून खडसेंच्या नावाचा ‘या’ कारणासाठी उल्लेख…

जुहू येथे बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू

जुहू कोळीवाडा पोलीस बीट चौकी जवळ रविवारी दोन जण समुद्रात बुडाले होते. त्यापैकी एकास बाहेर काढून पालिकेच्या कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या मुलाचे नाव प्रणय भोसले असून तो 19 वर्षाचा आहे. तर अन्य एकाचा गेल्या काही तासापासून शोध सुरू होता. अखेर सोमावारी 35 वर्षाच्या आशिष या तरुणाला समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपचेच लोक हे सरकार पाडतील अन्… ; सामनातून निशाणा

Next Post

10वी पाससाठी उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी…; 56 हजारापर्यंत वेतन मिळेल; याप्रमाणे अर्ज करा

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
10वी पाससाठी उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी…; 56 हजारापर्यंत वेतन मिळेल; याप्रमाणे अर्ज करा

10वी पाससाठी उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी...; 56 हजारापर्यंत वेतन मिळेल; याप्रमाणे अर्ज करा

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us