मुंबई, (प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर विश्वासदर्शक ठराव आज विधीमंडळात मंजूर झाला. त्यावर आभाराचे भाषण आज एकनाथ शिंदे यांनी केले. या वेळी त्यांनी सर्वचं मुद्यांना हात घालत चौफेर फटकेबाजी करत राज्याच्या विकासा संदर्भातील मुद्दे हाताळले दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विस्तृत भाषणा दरम्यान अनेक विषय, अनुभव, किस्से देखील सभागृहात मांडले. आज शिंदे सरकारचे पहिल्या अधिवेशनाचा दुसरा दिवस होता या वेळी आभाराचे भाषणा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथराव खडसेंच्या नावाचा उल्लेख करत मोठा आरोपही केला.
खडसे यांच्या बद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री….
महाविकास आघाडीचे सरकार आणि त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर कसा अन्याय होत होता याबाबत त्यांनी सभागृहात सांगताना थेट एकनाथराव खडसे यांच्यावर मुक्ताईनगर मतदार संघातील शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.एकनाथ खडसेंच्या भितीने मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख व तालुका प्रमुखच वॉन्टेड असल्यामुळे जिल्ह्याबाहेर लपून बसला होता. असे मुख्यमंत्री यांनी विधीमंडळात बोलतांना सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील किस्सा सांगितला, या मतदार संघातील शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा सभागृहात हवाला देवून ते म्हणाले कि, मक्ताईनगर तालुक्यातील घडलेल्या एका प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या भितीने शिवसेना उपजिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख सहा महिने बाहेर लपून बसले होते. त्यांना आपण स्वत: धीर दिला, आता आपले सरकार आले आहे, मी मुख्यमंत्री आहे, आता कुणाला घाबरू नका असे त्यांना आपण सांगितल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.