चाळीसगाव,(प्रतिनिधी)- सुनेच्या जाचाला कंटाळून सासूने थेट राहतं घर सोडलं मात्र जातांना सासूबाई पोटच्या मुलाच्या नावाने चिठ्ठी लिहून आपली धक्कादायक आपबीती जगासमोर आणली आहे. चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील शिवशक्ती नगर येथे सोमवारी सकाळी साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान उघडकीस आला. दिवसभर शोध घेऊन आई मिळून न आल्याने अखेर सायंकाळी चाळीसगाव शहर पोलिसात आई बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या मुलाने दिल्याने खळबळ उडाली.
काय आहे घटना….
घर सोडून गेलेल्या महिलेचे नाव अलकाबाई उत्तम चौधरी (वय – ५५) असे नाव आहे. त्या अचानक घरातून निघून गेल्यावर त्यांचा मुलाने रेल्वे स्टेशन, बस स्टैंड, दर्गा परीसरात, चाळीसगाव शहरात शोध घेतला मात्र आई कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे मुलगा गोकुळ चौधरी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
आईने काय लिहून ठेवलेय चिठ्ठीत ?
अलकाबाई यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी मध्ये म्हटले आहे की, गोकुळ तुझ्या बायकोच्या शिव्या ऐकून आता मला जगण्याची इच्छा नाही. मला मारण्याचा प्रयत्न झाला. अंगावर हात टाकला तरी मी तुझ्यासाठी सहन करत राहिली. तुझ्या बायकोचे तोंड बघायची इच्छा नाही. मला जगायचे सुद्धा नाही. असा मजकूर चिठ्ठी मध्ये असून चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.