महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये भरती निघाली आहे. शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 असणार आहे.
एकूण जागा 50
रिक्त पदाचे नाव :
शिकाऊ उमेदवार वीजतंत्री (Apprentice – Electrician)
आवश्यक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी संबंधित फिल्डमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना किमान पन्नास टक्के गुण मिळाले असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.