यावल : पाच हजाराची लाच घेतांना यावल तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
शेतीच्या सातबारा उतार्यावरील तक्रारदाराच्या बहिणीचे नाव अधिकार क्षेत्रातून कमी करून देण्याचे काम करून देण्यासाठी कोतवाल हमीद जहांगीर तडवी (रा.किनगाव, ता.यावल) याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयाची लाच मागितली होती. ती स्वीकारणे यावल तालुक्यातील कोतवालाला चांगलेच महागात पडले.
मंगळवार, 22 रोजी दुपारी 12 वाजता यावल तालुक्यातील मालोदमध्ये हा सापळा यशस्वी करण्यात आला. लाच घेताना हमीद जहांगीर तडवीसह खाजगी पंटराला लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
हे देखील वाचा :
मार्च महिन्यात ‘इतके’ दिवस बंद राहणार बँका, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी
मोठी बातमी! 1 एप्रिलपासून पीएफ खात्यांवरही लागू होणार कर, जाणून घ्या कोणाला बसणार फटका?
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला ‘हा’ निर्णय, मिळेल असा फायदा
सीमा सुरक्षा दलात 10वी पाससाठी बंपर रिक्त जागा, 69000 पगार मिळेल
RBI कडून ‘या’ तीन बँकांना दंड! यामध्ये तुमची बँक तर नाहीना?