Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगावात शेतकऱ्याच्या घराला आग, साडेसात लाखांची रोकड जळून खाक

Editorial Team by Editorial Team
February 21, 2022
in जळगाव
0
चाळीसगावात शेतकऱ्याच्या घराला आग, साडेसात लाखांची रोकड जळून खाक
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : तालुक्यातील पोहोरे गावातील एका शेतकऱ्याच्या घराला गॅस लीक झाल्यामुळे लागलेल्या आगीत तब्बल साडेसात लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. कापूस विकून आलेले रोख पैसे आगीत जळाल्याने पीडित कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे.

पोहोरे गावातील शेतकरी केशव राघव महाजन यांची पत्नी घरी गॅसवर डाळ शिजवत असताना अचानकपणे गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरमधून गॅस गळती होऊन आग लागली. या आगीत महाजन यांनी पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवलेले ७ लाख ७० हजार रुपये व अल्युमिनियमच्या डब्यांमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आगीत खाक झाले. तसेच संसार उपयोगी वस्तू, कपडे, भांडी व घरावरील लाकडाचा बीम संपूर्ण जळून खाक झाला. गावकरी व अग्निशमन विभागाचे कर्मचारी यांनी एकत्रित केलेल्या प्रयत्नातून आग आटोक्यात आणली

शेतकर्‍याला अश्रू अनावर
एवढ्या कष्टाने मेहनतीने कापूस पिकवला. दोन पैसे जास्त मिळतील या आशेने दोन दिवसांपूर्वी कापूस विकला आणि नियतीने असा घाला घातला असे म्हणत केशव महाजन यांनी गावकऱ्यांसमोर हंबरडा फोडला. पोलिसांनाही हे दृश्य पाहावलं नाही. मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पीएसआय योगेश ढिकले यांनी स्वत:च्या खिशातून पाच हजार रुपये तसेच पीएसआय अनिल शंकर यांनी ५ हजार १०० रुपये व पोलीस कॉन्स्टेबल मथुरे यांनी २ हजार रुपयांची मदत महाजन यांना दिली.

शासनाकडून मदत मिळण्याची मागणी
केशवराव महाजन यांच्या मालकीचे स्वतःचे घर नसून ते आधार दगा माळी यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत आहेत. या आगीत कमीत कमी २० लाख रुपये नुकसान झालेले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान आगीमध्ये होत्याचे नव्हते झाले, म्हणून केशव महाजन यांना तातडीने शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोहरी तेलाच्या दरात मोठी घसरण! सोयाबीनही स्वस्त होणार 

Next Post

चंद्रशेखर राव-उद्धव ठाकरेंच्या भेटीवरून फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
मलिकांनी लवंगी फटाका फोडला, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार; फडणवीसांचा इशारा

चंद्रशेखर राव-उद्धव ठाकरेंच्या भेटीवरून फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us