शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असतांना आज दिनांक १६ रोजी सकाळी संजय राऊत यांनी सूचक ट्विट करून म्हटलं आहे की,’बाप बेटे जेल मध्ये जाणार’ Wait and watch!कोठडीचे sanitization सुरू आहे..जय महाराष्ट्र ! असं म्हणत पुन्हा किरीट सोमय्या व त्यांच्या मुलावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांच्या कालच्या शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते मोहित कंबोज हे संजय राऊत यांच्या निशाण्यावर होते. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.दरम्यान आज संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे
बाप बेटे जेल मधे जाणार!
Wait and watch!
कोठडीचे sanitization सुरू आहे..
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 16, 2022