Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी

najarkaid live by najarkaid live
February 15, 2022
in राज्य
0
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई दि. १४ :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी हा उत्सव  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन साजरा न करता आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती ) साजरी करत असताना शिवज्योत वाहण्याकरिता २०० भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरिता ५०० भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी अथवा इतर गड / किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतात. परंतु, यावर्षी कोविड -१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करावा.

दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती” च्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे सर्वांवार बंधनकारक आहे, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या व्यवसायिकांनी ‘या’ योजनेअंतर्गत करा अर्ज

Next Post

रेल्वेत 2.65 लाखांहून अधिक पदे रिक्त, जाणून घ्या कुठे किती जागा?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
प्रवाशांनो लक्ष द्या…! रेल्वेने ‘या’ ११ विशेष गाड्या केल्या रद्द तर १२ गाड्यांचा मार्ग बदलला

रेल्वेत 2.65 लाखांहून अधिक पदे रिक्त, जाणून घ्या कुठे किती जागा?

ताज्या बातम्या

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us