Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेस आघाडीचे जागावाटप गांधी जयंतीला

najarkaid by najarkaid
September 30, 2019
in राजकारण
0
काँग्रेस आघाडीचे जागावाटप गांधी जयंतीला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील मित्र पक्षांचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असून, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे निमित्त साधून येत्या बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी काँग्रेस आघाडीतील जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या रविवारी मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानी काँग्रेस आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक रविवारी दुपारी झाली. त्यात आघाडीतील लहान मोठ्या घटक पक्षांना सोडण्यात यावयाच्या तसेच दोन्ही काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघाच्या अदलाबदलीवर बरीच चर्चा करण्यात येऊन अंतिम तोडगा दृष्टीपथात आल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.
काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना प्रत्येकी 125 जागा मिळणार आहे. तर आघाडीतील 11 मित्रपक्षांना 38 जागा देण्याचा निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले.
सत्ताधारी भाजप शिवसेना यांच्यातील संभाव्य युतीबाबत संभ्रम असल्यामुळे काँग्रेस आघाडीनेसुद्धा डावपेचाचा भाग म्हणून लगेच आघाडीतील जागावाटपाचा तोडगा जाहीर करण्याची घाई करू नये, असे यावेळी ठरले. दोन्ही काँग्रेसमधील अनेक मतदारसंघात अदलाबदल करण्याच्या प्रश्नावर मतैक्य न झाल्यामुळे उद्या सोमवारी पुन्हा दोन्ही काँग्रेसच्या निवडक नेत्यांची बैठक होणार आहे. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमानी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन स्वाभिमानी, समाजवादी पार्टी, महाराष्ट्रवादी बहुजन वंचित आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि लोकभारती असे 11 पक्षसंघटना आहेत.
येत्या बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी मंत्रालय परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करुन, याच भागातील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आघाडीतील 13 पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यात विधानसभेसाठीच्या महाआघाडीची घोषणा करण्यात येणार आहे, असे समजते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने 56 लहान मोठ्या पक्ष संघटनांना एकत्र करत महाआघाडीची मोट बांधली होती. धर्मनिरपेक्ष भूमिका असणार्‍या छोट्या पक्षांचा दोन्ही काँग्रेसला निवडणुकीत मोठा फायदा उठविता आला नव्हता.
आघाडीच्या आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, नसीम खान आदी नेते उपस्थित होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात हे उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसतर्फे येथे देण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुळाची जमीन परत देण्यासाठी मागितली 30 लाखांची लाच, आदर्श पुरस्कार विजेते पैठणचे तहसीलदार अटकेत

Next Post

काँग्रेसच्या बहुतेक आमदारांना पुन्हा संधी

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
काँग्रेसच्या बहुतेक आमदारांना पुन्हा संधी

काँग्रेसच्या बहुतेक आमदारांना पुन्हा संधी

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us