Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सक्षम हृदयासाठी तणावमुक्त राहा’

najarkaid by najarkaid
September 29, 2019
in राज्य
0
सक्षम हृदयासाठी तणावमुक्त राहा’
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-आनंदी व तणावमुक्त राहिल्यास विविध प्रकारांच्या आजारांपासून दूर राहता येते, मात्र अतिरिक्त तणाव घेतल्यास हृदयावर येणारा ताण वाढतो आणि हृदयविकारासह हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता अधिक बळावते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या तसेच तो न आलेल्या मात्र खूप ताण घेणार्‍यांनी तणावमुक्त राहायला हवे, याकडे हृदयविकारतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
विविध प्रकारच्या सर्वेक्षणांमध्ये कमी वयामध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे आढळले आहे. पूर्वी 45 ते 50 या वयोगटामध्ये होणारा हृदयविकार आता तीस ते पस्तीस वयोगटातच होताना दिसतो. विविध प्रकारच्या ताणतणावामुळे हे हृदयाचे कार्यही प्रभावित होते, अतिरिक्त ताणामुळे हे कार्य बिघडते, असेही हृदयविकारतज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या विकारांच्या वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये रुग्णांच्या नैराश्यग्रस्तता तसेच उदासीनतेसंदर्भातही वैद्यकीय चाचण्या करण्याची गरज अधोरेखित होत आहे. इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट डॉ. देव पहलजानी यांनी हृदय निकामी अवस्थेमध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत किंवा ताठर झाल्यामुळे पंपिंगच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, इस्केमिक हृदयविकारांच्या प्रमाणात मधुमेह आणि उच्चरक्तदाबासारख्या तक्रारी असलेले रुग्ण अधिक मोठ्या प्रमाणात दिसतात. अतिरिक्त ताणतणावामुळे उच्चरक्तदाबाचे प्रमाण वाढते, हृदय निकामी होण्यापूर्वी काही दिवस रुग्णांना संकेत मिळतात. ते ओळखून वैद्यकीय उपचार सुरू केले तर रुग्णांचा प्राण वाचवता येणे शक्य आहे.
मुंबईमध्ये विविध प्रकारचे हृदयविकार असलेल्या रुग्णांमध्ये नैराश्यग्रस्त रुग्णांचे प्रमाण 15 टक्के इतके आहे. कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग झालेले 20 टक्के रुग्ण नैराश्यग्रस्त असतात, त्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करताना अडचणी निर्माण होतात, नैराश्यग्रस्त व्यक्तींमध्ये विविध प्रकारचे शारीरिक बदल होतात, हृदयाचे ठोके वाढणे, रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे वेदनांची तीव्रता वाढते, शस्त्रक्रियेनंतर हृदयाची क्रिया पूर्ववत होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयविकारतज्ज्ञांनी या रुग्णांची उदासीनतेसंदर्भातही तपासणी करायला हवी, याकडे लक्ष वेधले आहे.
कॅल्शिअमची कमतरता- कार्डिओमायोपथी अ‍ॅण्ड हार्ट फेल्युअर सर्वेक्षणामध्ये कार्डिओमायोपथीच्या रुग्णांमध्ये कॅल्शियमची कमतरता, पोषक आहाराचा अभाव तसेच चयापचयाचे विकार अशी विविध कारणे आढळून आली आहेत. घर आणि करिअर या दोन्ही पातळ्यांवर करावी लागणारी कसरत, पालकत्वाचे बदलते स्वरुप, वाढलेल्या अपेक्षा, स्पर्धात्मक युगात सर्वोत्तम सिद्ध करण्याचा ताण, वाढते वजन, बॉडी शेमिंग अशा विविध कारणांमुळे महिलांमध्येही ताणतणाव वाढत आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा तीन ते चार टक्क्यांनी महिला रुग्णांमध्येही ही वाढ झाल्याचे दिसून येते. हृदयविकाराची लक्षणे जाणवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण पुरुषांइतकेच महिलांमध्येही आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रस्ता करा अन्यथा मतदानावर बहिष्कार; परभणी जिल्ह्यातील 10 गावांचा निर्णय

Next Post

विधानसभा निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी   जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन

विधानसभा निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us