मुंदाणे प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र.उ. येथील वाल्मीक उर्फ दीपक अधिकार पाटील (वय २२) या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मुंदाणे ते हनुमंखेडे दरम्यान रस्त्यावर घडली.
हे देखील वाचा :
ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबले, कार तलावात जाऊन ‘जैन कंपनी’च्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
उच्चशिक्षित तरुणाची सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या, रुममध्ये आढळली सुसाईड नोट
Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी
ग्रामगौरव शासन आणि जनतेचा दूत ठरावे ; मंत्री ना.हसन मुश्रीफ यांची अपेक्षा
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व पार्थिव शवविच्छेदनासाठी कुटीर रुग्णालयात नेण्यात आला अाहे. वाल्मीक पाटील यांच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंदाणे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी माेठी गर्दी केली होती. घरातील कर्ता व एकुलता-एक मुलाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली हाेती.