मुंबई- ग्रामविकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र उंच भरारी घेत आहे. महाविकास आघाडी सरकार अनेक लोकाभिमुख उपक्रम व योजना राबवत असतांना लोकसहभाग वाढावा म्हणून ग्रामगौरव मासिक हे शासन आणि जनतेचा दुवा ठरावे,अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
श्री.साई मल्टिसर्व्हिसेस प्रकाशीत मासिक ‘ग्रामगौरव’ च्या पहिल्या स्वागत अंकाचे विमोचन राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते येथील मंत्रालयासमोरील बंगल्यावर आज १२ जानेवारी रोजी पार पडले. यावेळी ना.मुश्रीफ यांनी जळगाव सारख्या ठिकाणाहून अगदी राज्याच्या प्रत्येक गावाला विकासाची दिशा देणारे ‘ग्रामगौरव’ हे एक उपयुक्त प्रकाशन असल्याचे नमूद करत प्रकाशनाच्या सर्व चमुचे कौतुक केले.
हे देखील वाचा :
ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबले, कार तलावात जाऊन ‘जैन कंपनी’च्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
दिलासादायक ! देशात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट, बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढला
Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी
MPSC ; राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर
मासिकाच्या एडिटर ईन चिफ कु.धनश्री ठाकरे यांनी ना.मुश्रीफ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कु.ठाकरे यांनी १२ जानेवरी रोजीच्या हिंदवी स्वराज्याच्या प्रणेत्या राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच युवा संकल्प दिनानिमित्त मासिक
ग्रामगौरवचा स्वागत अंक प्रकाशित होत असल्याचा आंनद असल्याचे आपल्या प्रास्ताविकात नमूद केले.ग्रामगौरवचे संपादकीय धोरण तसेच मासिक निर्मिती मागील भूमिका समूह संपादक विवेक ठाकरे यांनी स्पष्ट केली.
अंकाच्या प्रकाशनानंतर झालेल्या अनौपचारिक गप्पांवेळी मासिकात असलेल्या ग्रामविकास विभागाच्या कामांचा व योजनेचा आढावा मांडणाऱ्या ‘सत्ता विकेंद्रीकरणावर भर’ या कव्हर स्टोरी तथा मुलाखतीत मानद संपादक अमोल मचाले यांनी सर्व मुद्दे समाविष्ट केल्याबद्दल मंत्री ना.मुश्रीफ यांनी आंनद व्यक्त करून प्रकाशनाचे ऋण मानले.
विमोचन कार्यक्रमावेळी नगरचे आ.संग्रामदादा जगताप यांची विशेष उपस्थिती होती.विमोचन कार्यक्रमासाठी लोकप्रशासन डिजिटल मीडियाचे संचालक व जनसंग्राम न्यूज नेटवर्कचे मंत्रालय प्रतिनिधी आर्यन आखाडे यांच्यासह जनसंग्राम न्यूज नेटवर्कचे मॅनेजर (ऑपरेशन) शरद चौधरी व राजू भडके यांनी विशेष परिश्रम घेतले.ग्रामगौरव मासिकाचे वाणिज्य संपादक विशाल घोडेस्वार यांनी आभार मानले.