मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे अर्थात आयआयटी बॉम्बेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने हॉस्टेल इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्याच्या रुममध्ये सुसाईड नोट सापडल्याची माहिती मिळत आहे. नैराश्याने ग्रासलेल्या विद्यार्थ्यावर वैद्यकीय उपचार सुरु असल्याचंही समोर आलं आहे. या घटनेमुळे हॉस्टेल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.
काय आहे प्रकरण?
आयआयटी बॉम्बेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेणाऱ्या 26 वर्षीय विद्यार्थ्याने सोमवारी सकाळी आत्महत्या केली. त्याने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली .या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांनी सांगितले की, एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्याला नैराश्याने ग्रासले होते आणि त्याच्यावर उपचार सुरु होते.
हे देखील वाचा :
ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबले, कार तलावात जाऊन ‘जैन कंपनी’च्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
दिलासादायक ! देशात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट, बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढला
Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी
ग्रामगौरव शासन आणि जनतेचा दूत ठरावे ; मंत्री ना.हसन मुश्रीफ यांची अपेक्षा
सुसाईड नोटमध्ये काय?
“त्याच्या जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये, त्याने सांगितले की त्याला नैराश्याने ग्रासले आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत, त्याने आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरले नाही. पुढील तपास सुरु आहे” अशी माहिती पोलिसांनी दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करत होता आणि दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता.