Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बस-टँकरची भीषण टक्कर, 12 जणांचा होरपळून मृत्यू

Editorial Team by Editorial Team
November 10, 2021
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
बस-टँकरची भीषण टक्कर, 12 जणांचा होरपळून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

बारमेर : राजस्थानच्या बाडमेरमध्ये भीषण अपघातानंतर आग लागल्याची घटना समोर आली आहे. बारमेर जिल्ह्यातील पाचपदरा पोलीस स्टेशन हद्दीतील जोधपूर महामार्गावरील भंडियावासजवळ बुधवारी बस आणि ट्रेलरची धडक झाली, त्यानंतर बसला आग लागली आणि या अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की या आगीत सुमारे दोन डझन लोक जळून खाक झाले. जखमींना बालोत्रा ​​येथील नाहाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पाचपदरा पोलीस ठाण्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाने आग आटोक्यात आणली असून बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी

घटनेची माहिती मिळताच विभागीय आयुक्त राजेश शर्मा, बाडमेर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सुखराम बिश्नोई आणि पाचपदराचे आमदार मदन प्रजापत घटनास्थळी पोहोचले. त्याच बारमेरचे जिल्हाधिकारी लोक बंधू आणि पोलीस अधीक्षक दीपक भार्गव हे देखील जिल्हा मुख्यालयातून घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली असून तेथे नागरिकांचीही मोठी गर्दी झाली आहे.

जखमींवर उत्तम उपचार : अशोक गेहलोत
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून सांगितले की, ‘बाडमेरमधील बस-ट्रक अपघातासंदर्भात मी बारमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोललो आहे आणि मदत आणि बचाव कार्याबाबत निर्देश दिले आहेत. जखमींवर सर्वोत्तम उपचार केले जातील.

बसमध्ये आणखी काही लोक अडकल्याची भीती
बस आणि टँकरची टक्कर होताच बसला आग लागली आणि त्यामुळे बसमधील लोक त्यात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. काही लोक खिडकी तोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर बहुतांश लोक आत अडकले. बसमध्ये आतापर्यंत किती प्रवासी अडकले आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सातत्याने बचावकार्यात गुंतले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Vodafone-Idea चा सर्वात स्वस्त प्लॅन, मोफत कॉलिंगसह इंटरनेटचा घ्या आनंद 

Next Post

गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा, मुद्देमालासह दोघे गजाआड

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल

गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा, मुद्देमालासह दोघे गजाआड

ताज्या बातम्या

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us