पश्चिम रेल्वे मुंबई येथे 80 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे. GDCE कोट्याच्या अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे.
या पदांसाठी भरती
१) कनिष्ठ स्टेनोग्राफर
२) कनिष्ठ अनुवादक /हिंदी
३) कनिष्ठ अभियंता
४) तंत्रज्ञ (Technician)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
कनिष्ठ स्टेनोग्राफर : उमेदवाराचं दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित स्टेनोग्राफर म्हणून संपूर्ण शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
कनिष्ठ अनुवादक /हिंदी –उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच संबंधित पदाशी निगडित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता –उमेदवारांनी संपूर्ण तीन वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.तसंच संबंधित पदाशी निगडित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
तंत्रज्ञ –उमेदवाराचं दहावी किंवा ITI पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.तसंच संबंधित पदाशी निगडित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवड
या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड ही सुरुवातीला कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेऊन केली जाणार आहे. यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची टेक्निकल आणि स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून मेडिकल टेस्ट केली जाणार आहे. अशा पद्धतीनं उमेदवार निवडण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2021
जाहिरात : PDF