पाचोरा,(किशोर रायसाकडा)- पाचोरा नगर परिषद स्वच्छ शहर सुंदर शहर हा उपक्रम राबवत असले तरी पाचोरा नगर परिषदेच्या परिसरात दारुच्या खाली बाटल्यांचा खच पडलेला दिसत असल्याने नगर परिषद प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
कर्तव्य दक्ष अधिकारी मात्र अनभिज्ञ आहेत का?
पाचोरा नगर परिषद स्वच्छता चे दररोज सकाळी गल्लोगल्लीत स्वच्छ अभियानाचे गाणं वाजवत असले तरी नगर परिषदेच्या परिसरातच दारूच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या खाली बाटल्यांचा खच पाहवयास मिळत आहे. याबाबत नगर परिषदेचे अधिकारी खरंच अनभिज्ञ असतील का असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
असा प्रश्र्न उपस्थित होत आहे.