जळगाव, (प्रतिनिधी)- राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांची आज दिनांक 5 रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून याबाबत खुद्द त्यांनीच आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करुन माहिती दिली.
गृहमंत्री ना. अनिल देहमुख यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की,आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.















