Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भूजल स्पर्धेत सहभागी चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा क्र४, ब्राम्हणशेवगे – नाईकनगर, चिंचगव्हाण सुंदरनगर यांना मिळाली लाखोंची बक्षिसे…

najarkaid by najarkaid
November 8, 2020
in जळगाव
0
भूजल स्पर्धेत सहभागी चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा क्र४, ब्राम्हणशेवगे – नाईकनगर, चिंचगव्हाण सुंदरनगर यांना मिळाली लाखोंची बक्षिसे…
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – जलसाक्षरता ही काळाची गरज असून ज्याप्रमाणे गावात डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक असतात त्याप्रमाणे पाण्याचे ज्ञान असणारे लोक देखील असले पाहिजेत. चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियानाच्या माध्यमातून जलसाक्षर असणारा प्रशिक्षित वर्ग गावागावात निर्माण झाला तर पुढील काळात आपण जलसंपन्न ठरू यासाठी चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु झालेला भूजल अभियानाचा चाळीसगाव पॅटर्न राज्यात पथदर्शी ठरेल असे प्रतिपादन भूजल तज्ञ तथा सहज जलबोधकार उपेंद्र धोंडे यांनी केले.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी फौंडेशन संचालित भूजल अभियान अंतर्गत सहज जलबोध अभियानाच्या माध्यमातून, पहिले खान्देशस्तरीय जल-संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. सदर संमेलन हे चाळीसगाव येथील लक्ष्मीनगर मधील राजपूत मंगल कार्यालय येथे उत्साहात आणि आनंदात संपन्न झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्री. बी. एन. पाटील, श्री दिवाकर धोटे उपसंचालक GSDA नाशिक, सौ . अनुपमा पाटील भूजल तज्ञ जळगाव, श्री उपेंद्र धोंडे सहज जलबोधकार पुणे , श्री अनिल भोकरे जिल्हा कृषी उपसंचालक जळगाव, तसेच तालुक्याचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे आणि गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते,
संमेलनाचे उद्घाटन मागील वर्षी भूजल स्पर्धेत चाळीसगाव तालुक्यात सहभागी झालेल्या ११ गावात निर्माण झालेल्या पाणीसाठ्या मधून आणलेल्या पाण्याचे मंचावर निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात जल पूजन करून करण्यात आले. तसेच मागील वर्षी चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियानाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांची माहिती देणारी चित्रफित व गाण्याचे प्रक्षेपण देखील करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ.बी.एन.पाटील साहेबांनी स्वीकारले तर उपेंद्र धोंडे यांनी सहज जलबोध अभियाना बद्दल मार्गदर्शन केले , तसेच गुणवंत सोनवणे संगणक अभियंता पुणे यांनी मागील वर्षी भूजल अभियानाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात झालेल्या कामाचा प्रवास आणि पुढील वर्षी होणाऱ्या कामांची माहिती सांगितली , मागील वर्षी सुरू झालेल्या शिवनेरी फौंडेशन संचलित भूजल अभियाना अंतर्गत ज्या गावांनी जल संधारण आणि मृदा संधारण चे स्पर्धे दरम्यान उकृष्ट दर्जाची कामे केली त्या गावांत प्रथम पारितोषिक चैतन्य तांडा क्र.०४ ला १ लाख ५१ हजार रु, द्वितीय पारितोषिक ब्राम्हण शेवगे-नाईकनगर येथे १ लाख १ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक सुंदरनगर-चिंचगव्हान ७५ हजार रु. या गावांनी पटकावले त्या बद्दल तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गावांचे अभिनंदन तसेच कौतुक केले आणि पुढील भूजल अभियानाच्या प्रवासा साठी तालुक्यातील निवड करण्यात आलेल्या २६ गावांना शुभेच्छा दिल्या. विठ्ठलाची वारी ही कुणाच्या मालकीची नसते तसेच त्यात जात / पात, पक्ष / भेद देखील नसतो त्याच शुद्ध अंतकरणाने ही जलवारी सुरु केली असून तालुक्यात सुरू झालेल्या या जल चळवळी साठी सगळ्याच राजकीय, सामाजिक आणि शासकीय क्षेत्रांतील लोकांनी पुढें यावं यासाठी आवाहन केले, तसेच पुढील काळात शासकीय मदतीच्या पलीकडे जावून नावासाठी नाही तर गावासाठी हे ब्रीदवाक्य घेत जल व निसर्ग संवर्धनासाठी सर्वोत्तपरी मदत देण्याचे आश्वासन देखील दिले.
जल संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात शासकीय पातळीवर ग्रामविकासासाठी महत्वाच्या असणाऱ्या या अभियानाला सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली तसेच कृषी उपसंचालक अनिल भोकरे साहेब यांनी उपलब्ध असणाऱ्या पाण्याचे नियोजन व पिकपद्धती यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे वक्ते म्हणून जितेंद्र पाटील ( तांत्रिक प्रशिक्षक, भूजल अभियान चाळीसगाव ) यांनी आदर्श भूजल आराखडा या विषयावरती मार्गदर्शन केले तसेच भागवत बैरागी कुंझर यांनी तलाव पुनर्भरण आणि योगेश सोनवणे कळमडू यांनी निसर्गबेट यावरती मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे जलसंमेलनात मार्गदर्शन करणारे वक्ते हे चाळीसगाव तालुक्यातीलच प्रशिक्षित वक्ते असल्याने पुढील काळात त्यांची मदत तालुक्यातील चळवळीला होईल असा आशावाद आयोजकांचा होता.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय कोळी अभियान प्रमुख चाळीसगाव यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांचें आणि कार्यक्रमाला आलेले सगळेच जलप्रेमी आणि निसर्गप्रेमी यांचे आभार शिवनेरी फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा चव्हाण यांनी मानले…संमेलन यशस्वीतेसाठी भूजल अभियान कोअर टीम आणि आमदार कार्यालयातील संपूर्ण स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री.गो. से. हायस्कुल, पाचोरा येथे नवनियुक्त पर्यवेक्षक यांचा सत्कार

Next Post

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये १०वी, १२वी पास उमेदवारांची पद भरती

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये १०वी, १२वी पास उमेदवारांची पद भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये १०वी, १२वी पास उमेदवारांची पद भरती

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us