पाचोरा – वरगव्हाण येथे झालेल्या पाणी पुरवठा अपहार प्रकरणाची चौकशी करण्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱयांनी आज येथे येऊन चौकशी करून अहवाल जिल्हा परिषद सीईओना सादर करणार असल्याचे सांगितले.
तालुक्यातील येथील ग्राम पंचायतीत सन २००1 ते २०१८ या कालावधीत विविध योजनेत विशेष करून पाणी पुरवठा योजनेत मोठा अपहार झाला असल्याची तक्रार येथील महेंद्र पाटील व हैदर तडवी यांनी केल्यावरून आज गुरूवार रोजी चाळीसगाव येथील सहाय्यक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांनी येऊन चौकशीकामी लागणारे दप्तर उपलब्ध करून घेत लवकरच वस्तुनिष्ठ चौकशी करीत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांचे सादर करणार असल्याचे सांगीतले.