पाचोरा, (प्रतिनिधी)- शहरातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी
डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस
अधीक्षक डाॅ पंजाबराव उगले यांनी भेट देऊन आज रोजी परिस्थितीचा आढावा घेतला.
गेल्या चार पाच दिवसात पाचोरा शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता येणाऱ्या काळात कोरोना संसर्ग रोखण्या करिता उपाय योजना राबविण्याबात जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला काही सूचना केल्या तर नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेऊन अनावश्यक घराबाहेर पडू नये असे अवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.