जळगाव,(प्रतिनिधी)- खरेदी करून दिलेल्या घरात लिव अँड लायसन्स करारनामा करून राहणाऱ्या कुटुंबाने खोटे दस्ताऐवज करून, खोटी व बनावट सही करून घर बाळकाविल्या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी संदीप शिवराम गुजर, वय 60, धंदा व्यापार, रा. दिव्य जीवन वाटीका आश्रम जवळ खोटे नगर, जळगाव यांनी शहर पोलीस स्टेशनला हजर होवुन फिर्याद दिली आहे की मौजे मेहरून महाबळ शिवारातील शेत सर्वे नं.447/3मधील प्लॉट नं. 20चे पूर्व दक्षिण कोप-यातली ब्लॉक नं. 1 यामध्ये लिव्हींग रूम किचन 1बेडरूम संडास बाथरुम सह ची घर मिळकत मी सन2008 मध्ये अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी यांचेकडुन रक्क्म रुपये 5,00,000/- मोबदला देवुन नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 297/2008 दिनांक 24/01/2008 अन्वये खरेदी केलेली होती.
त्यानंतर सन 2019 मध्ये मी सदरची मिळकत ही नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र.2261/2019 दिनांक 09/05/2019प्रमाणे अमित सुरेंद्र भाटीया यांना 12,90,000/- रुपयात विक्री केली तेव्हा सदर मिळकतीत अनिरुद्ध कृष्णराय कुलकर्णी व त्यांचे कुटुंब लिव अॅन्ड लायसन्स करारनामा 100/-रुपयाच्या मुद्राकांवरती दिनांक 18/09/2018 करारनाम्या प्रमाणे राहत होते. मी अमित भाटीया यांना खरेदीखत नोंदवुन देण्यापुर्वी अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी यांना पत्र देवुन घर खाली करुन मागीतले होते परंतु लिव अॅन्ड लायसन्स करारनामा ची मुदत न संपल्याने त्यांनी घर खाली केले नाही. करार मुदत संपवल्यावर नविन मालक अमित भाटीया यांना परस्पर ताबा देण्याचे अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी यांनी मान्य व कबुल केलेले होते.
त्यानंतर कराराची मुदत संपुन ही अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी यांनी घर खाली न केल्याने नविन मालक अमित भाटीया यांनी अनिरुद्ध कुलकर्णी यांना नोटीस देवून घर खाली करण्याची मागणी देखिल केली होती. परंतु त्यांनी घर खाली केले नाही. त्यानंतर लॉकडाउन जारी झालेला होता. त्यानंतर देखिल कुलकर्णी यांनी घर खाली न केल्याने त्यांनी नविन घर मालक अमित भाटीया यांची व मनपा जलगाव यांची कुठलीही पुर्व परवानगी न घेता परस्पर बेकायदेशिररित्या वरच्या मजल्याचे बांधकाम सुरु केल्याने अमित भाटीया यांनी अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी, सुभद्रा अनिरुद्ध कुलकर्णी, अनिकेत अनिरुद्ध कुलकर्णी यांचे विरुद्ध जळगाव न्यायालयात घर खाली करुन मिळणेसाठी दावा क्रं. स्पै.मु.नं.231/2022 अन्वये दाखल केला त्या दाव्याचे कामी कुलकर्णी परीवार हा मा. न्यायालयात हजर झाल्या नंतर त्यांनी दिनांक 06/02/2023रोजी एकुण 07 कागदपत्रे दाखल केली त्यामध्ये त्यांनी 09/07/2007 रोजीचा आपसात समजोतीचा करारनामा 100/-रुपयाच्या मुद्राकांचा एस.पी. बावस्कर मुद्रांक विक्रेता शेगाव परवाना क्र.2/91चा मुद्राक विकत घेणारा मिलिंद नारायणराव सोनवणे रा. जळगाव अशा मजकुराचा करार हा लिहून देणार” संदीप शिवराम गुजर व लिहून घेणार अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी या मजकुराचा आपसी समजोता करारनामा करुन दिल्या बाबतचा करारनाम्याची झेरॉक्स प्रत अनिरुद्ध कुलकर्णी यांनी मा. न्यायालयात दाखल केलेली आहे.
सदर कागदपत्र अमित भाटीया यांनी मला आणुन दाखविले. सदर करारनाम्याचे अवलोकन केले असता अटी व शर्तीनुसार भी सदर प्रापॅटी बाबत 1. तुम्ही लिहुन घेणार यांच्या मालकीची व कब्जे उपभोगातील वर नमुद पत्यावरील घर मिळकत हि हातउसनवारीवर रूपये पाच लाख मात्र च्या बदल्यात वसुलीच्या सुरक्षिततेसाठी मी लिहून देणार यांच्या नावावर खरेदी खतावर नोंदवुन दयावयाची आहे. 2. मी लिहून देणार यांनी सदर घर मिळकत खरेदी खत करुन घेतल्यानंतर सरकार दप्तरी नावावर फेरफारची नोंद करावयाची नाही. तसेच सदर घर मिळकतीचा कोणाशीही कोणताही व्यवहार करावयाचा नाही. 3. सदर करार नाम्यात नमुद रक्कम जो पर्यंत तुम्ही लिहुन घेणार हे व्याजासह परफेड करीत नाहीत तो पर्यंत सदर घर मिळकती संदर्भात येणारी घरपटटी, पाणीपटटी, विजेचे बिल वगैरे भरण्याची जबाबदारी तुम्ही लिहुन घेणार यांचीच राहणार आहे.
4. तुम्ही लिहुन घेणार यांनी सदर रक्कम पाच लाख रुपये च्या बदल्यात मी लिहून देणार यांना दरमहा तीन टक्के रक्कम व्याजापोटी दयावयाची आहे. 5. मी लिहून देणार यांनी देत असलेली रक्कम पाच लाख रुपये मात्र वर तुम्ही लिहुन घेणार यांनी वर नमुद केल्याप्रमाणे दरमहा तीन टक्केप्रमाणे व्याज दयावयाचे असुन सदरची सपुर्ण रक्कम व्याजासह परतफेड केल्यानंतर मी लिहून देणार यांनी सदर घर मिळकतीचे खरेदीखत पुन्हा तुम्ही लिहुन घेणार यांच्या नावावर करून दयावयाचे आहे. त्यावेळी खरेदी खताचा खर्च तुम्ही लिहुन घेणार यांना करावा लागेल. अशा प्रकारच्या अटी व शर्ती नमुद केल्याचे मला दिसुन आले. सदर करारनामा खोटा व बनावट असुन त्यावरील माझी सही देखील बनावट केलेली असल्याचे दिसुन आले. मी अनिरुध्द कुलकर्णी यांना सदर करारनामा कधीही करुन दिलेला नाही त्यामधील साक्षीदार मिलींद नारायण सोनवणे व मंगल चंपालाल पाटील यांना देखील मी कधीही भेटलेलो नाही त्याचप्रमाणे सदर करारनामा जळगाव येथील नोटरी करणारे कालींदी चौधरी यांचेकडे नोंदविल्याचे दाखविले आहे. मी कालींदी चौधरी यांना ओळखत नाही किंवा दि. 10/07/2007 अथवा त्यानंतर कधीही त्यांचेसमक्ष सदर करारावर तसेच त्यांचे रजिस्टरवर देखील सही केलेली नाही. सदरचा करार खोटा व बनावट असुन मी करुन दिलेला नाही. त्यावर माझे नावावर दाखविलेली सही देखील माझी नाही. तसेच मी अनिरुध्द कुलकर्णी यांना पाच लाख रुपये रोख किंवा बॅक ट्रान्जेक्शनने दिलेले नाहीत.. याबाबत मी अमित भाटीया यांना सांगीतले.
तरी दि. 06/02/2023. रोजी. 1) अनिरुध्द कृष्णराव कुलकर्णी, 2) सुभद्रा अनिरुध्द कुलकर्णी, 3) अनिकेत अनिरुध्द कुलकर्णी, तिन्ही रा. शारदा कॉलनी जळगाव, 4) मिलींद नारायण सोनवणे, रा. 7 नुतन वर्षा कॉलनी, महाबळ जळगाव, 5) मंगल चंपालाल पाटील, रा. जळगाव, 6) ए.पी. बावस्कर, रा. शेगाव, ता. जि. बुलढाणा यांनी नवीपेठ भागात कालींदी चौधरी यांचे ऑफिसात आपसांत संगणमत करुन आपसी समजोताचा खोटा दस्ताऐवज तयार करुन माझी खोटी सही करुन, सदरचा दस्ताऐवज खरा असल्याचे बाबत अमित भाटीया यांनी दाखल केलेल्या दावा क्रं 231/2022 च्या सुनावणीचे वेळी मा. न्यायालयात सादर केला यामुळे फसवणुक केलेबाबत व खोटा दस्ताऐवज तयार केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

