जळगाव : मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाममधील रूद्राक्ष महोत्सवावरून घराकडे परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा मध्यप्रदेशात अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. या अपघातात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ४ भाविक जखमी झाले आहेत. शोभाबाई लुकडू पाटील (वय-५२), कमलबाई आत्माराम पाटील (वय-५५) दोन्ही रा. पातोंडा. ता अमळनेर अशी दोन्ही मयत महिलांची नावं असून त्या एकाच कुटुंबातील जेठाणी देरानी आहेत.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील भाविकांची ४ वाहने १३ फेब्रुवारी रोजी सीहोरला शिवकथा महापुराण व रूद्राक्ष महोत्सवासाठी गेली होती. याठिकाणी भाविक दोन ते तीन दिवस थांबले. मात्र, रुद्राक्ष घेण्यासाठी झालेली गर्दी आणि चेंगराचेंगरी हे बघून भाविकांनी रुद्राक्ष न घेताच पुन्हा जळगावकडे निघण्याचा निर्णय घेतला.
गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पातोंडा येथील भाविकांची तीन ते चार वाहने जळगावकडे मार्गस्थ झाली. या वाहनांपैकी एमएच १९ डीव्ही ६७८३ या क्रमाकांचे वाहनावरील चालकाचे पहाटे पाच वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील जुलवानानिया गावाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वाहन झाडावर आदळले.
हे पण वाचाच..
राज्यातील सत्तासंघर्षावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणीत काय घडलं??
अर्थमंत्र्यांची सर्वसामान्यांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेल तब्बल इतक्या रुपयांनी होणार स्वस्त?
जळगाव महापालिकेमार्फत या पदासाठी निघाली भरती ; ‘एवढा’ पगार मिळेल..
वाहनात एकूण ६ जण होते, त्यापैकी शोभाबाई लुकडू पाटील, कमलबाई आत्माराम पाटील या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या वाहनाच्या मागून गावातील इतर भाविकांची वाहने येत होते, त्यामुळे अपघाताची घटना समोर आली. चार जणांना धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

