जळगाव,(प्रतिनिधी)- श्री.चामुंडा माता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज अँड पी.ई. तात्या पाटील आय हॉस्पिटल, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री मीनाताई ठाकरे प्राथमिक तथा कैलासवासी शेठ दौलत मोतीराम जगताप माध्यमिक आश्रमशाळा केकतनिंभोरे,तालुका जामनेर येथील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना केकतनिंभोरे येथील शाळेतून चामुंडा माता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव येथे कॉलेजच्या बसच्या माध्यमातून नेण्यात आले. त्या ठिकाणी योग्य त्या चिकित्सा करण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांना होमिओपॅथिक औषधी चे सुद्धा वितरण करण्यात आले, तसेच नेत्रदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मा देण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समीर साकळीकर तसेच नेत्र विभागाचे प्रमुख नेत्रचिकित्सक डॉ .जयेश वाल्हे ,डॉ. अनिता श्रीवास्तव, डॉ. संदीप पाटिल यांच्या माध्यमातून हा कॅम्प यशस्वी करण्यात आला तसेच शाळेचे शिक्षक पी. डी. पाटील सर, स्वप्निल महाजन सर, महेश शिंपी सर , नरेंद्र चिंचकर यांनी यासाठी परिश्रम घेतले.