सीलखो : नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना हरियाणातील नूंह जिल्ह्यातील सीलखो येथून समोर आलीय. एक काका त्याच्या विवाहित पुतणीसह पळून गेल्याची घटना घडली. घरातून दोन लाख रुपये रोख आणि दीड लाखांचे दागिने घेऊन ही महिला प्रियकरासह फरार झाली. पीडित महिलेच्या पतीने आरोप केला आहे की, आरोपी हा संबंधीत महिलेचा काका असल्याचं सांगितलं आहे.
पीडितेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीलखो येथील रहिवासी असलेल्या पतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, झिमरावत फकिराबस येथील रहिवासी असलेल्या मुस्कान याच्याशी चार महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही कालावधीनंतर पत्नीचे झिमरावत येथील सद्दाम याच्यासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती त्याला समजली.
लग्नाच्या एक महिन्यानंतर सद्दाम पत्नीला भेटायला आला. ज्याला गावात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. नंतर पंचायत स्तरावर घेतलेल्या निर्णयात तो गावात परत येणार नाही या अटीवर सोडून देण्यात आले. मात्र सद्दामने ऐकलं नाही आणि रविवारी रात्री पत्नीला फूस लावून पळवून नेले. या संपूर्ण घटनेत सद्दामच्या कुटुंबीयांनी त्याला पाठिंबा दिल्याचं म्हटलं आहे.
हे पण वाचाच..
राज्यातील सत्तासंघर्षावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणीत काय घडलं??
अर्थमंत्र्यांची सर्वसामान्यांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेल तब्बल इतक्या रुपयांनी होणार स्वस्त?
जळगाव महापालिकेमार्फत या पदासाठी निघाली भरती ; ‘एवढा’ पगार मिळेल..
पत्नीने घरातून दोन लाख रुपयांची रोख रक्कम, दीड लाख रुपयांचे दागिने आणि मोबाईल घेऊन गेल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला आहे. सद्दाम व्यतिरिक्त हसम, मुबीना, दिनू आणि तपकन रहिवासी मुस्ताक यांचाही त्याच्या पत्नीला पळवून नेण्यात हात असल्याचं पतीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

