भुसावळ : एक अल्पवयीन मुलगीचे फेसबुकवर तरुणासोबत प्रेमाचं सुत जुळले. नंतर मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मुलगी घरी न आल्याने याबाबत मुलीच्या वडिलांनी मुलगी हरविल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसानी तिचा शोध घेतला. आणि तिला परत आणून बालकल्याण समितीकडे ठेवण्यात आले. यानंतर मुलीने आपल्या जाबाबात धक्कादायक माहिती दिली. प्रियकराने आणि त्याच्या बापाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आले असून त्या दोघांना पोलिसांनी अटक केले आहे.
याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे फेसबुकवर एका सोबत प्रेमाचं सुत जुळल्याने ती व तीचा प्रियकर दि. २९ सप्टेबर गुरुवार रोजी घरातून पळून गेले होते. ही गोष्ट मात्र बापला माहित नसल्याने वरणगाव पोलीस स्टेशनला मूलगी सकाळी दहा वाजेला सायकलीने कॉलेजला जाते म्हणून सांगून गेली होती, संध्यकाळ सहा वाजेपर्यत मूलगी घरी आली नाही म्हणून नातेवाईकांसह शोध घेत असताना तीची सायकल गवतात पडलेली दिसली. मात्र मूलीचा शोध लागलाच नसल्याने बापाने मूलीच्या हरविलेल्या बाबत तक्रार दिल्यानंतर पोलीस निरिक्षक आशिष अडसुड यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीचा शोध घेत फौजदार नरसिंग चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरातमधील सोरठी सोमनाथ येथून घेऊन आले होते. दरम्यान त्या मूलीला बाल कल्याण समितीकडे पाठविण्यात आले होते.
हे पण वाचा :
रेस्टॉरंटमध्ये पती प्रेयसीसोबत, पत्नीला मिळाली खबर, नंतर काय झालं वाचा.. जळगावतला प्रकार
..आता दिवाळी तरी गोड करा; शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
ठाकरेंची पुन्हा एकदा कोंडी? ‘त्या’ चिन्हांवर शिंदे गटाचाही दावा?
सोने-चांदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी.. आज तब्बल ‘इतक्या’ रुपयांची झाली घसरण, वाचाच नवीन दर
तेथे पिडीत मूलीने आपल्या जबाबात प्रियकराने व त्याच्या बापाने अत्याचार केल्याचे सांगितल्याने वरणगाव पोलीसांनी प्रियकर व मूलीच्या बापाला अटक करण्यात आली. पोलीस स्टेशनला याबाबत त्या दोघांविरोधात भादवी कलम ३७६ प्रमाणे पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सह उप पो. निरिक्षक परशुराम दळवी हे करीत आहे. त्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे