यावल : तालुक्यातील किनगाव येथील 22 वर्षीय तरूणाने ठाणे (मुंबई) येथील मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. गणेश अनिल निंबायत असे या तरूणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने सुसाइड नोट लिहत निराशा व्यक्त केली आहे.
किनगाव बुद्रुक येथील रहिवासी गणेश निंबायत हा तरुण ठाणे (मुंबई) येथे गोदरेज कंपनीत नोकरीला होता. गणेशने बुधवारी पहाटेपुर्वी मामाच्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली. तत्पूर्वी चिठ्ठी लिहित मी एक जवाबदार मुलगा होवू शकलो नाही, मी एक जवाबदार भाऊ होवू शकलो नाही असे लिहून आपली निराशा स्पष्ट केली आहे. तरुणाच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परीवार आहे. त्याचा मृतदेह बुधवारी रात्री किनगावात आणून अंतसंस्कार करण्यात आले.
हे पण वाचा :
सावधान ! कफ सिरप प्यायल्याने 66 मुलांचा मृत्यू ; WHO ने भारतातील चार कफ सिरपविरोधात जारी केला अलर्ट
शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ; जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी
प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाची आत्महत्या ; मनोरंजन सृष्टी पुन्हा हादरली
इंग्रजीत लिहिली सुसाईड नोट
चुपचुपके रोया मेरी परेशानी छुपा के, हर चेहरे के आगे थक चुका हू मुस्कुराके.. अशी सुरवात करीत सामान्य कुटुंबातील या तरूणाने इंग्रजी भाषेत सुसाइड नोट लिहत आपण जवाबदारी पार पाडू शकलो नाही, असे सांगत एक पक्षाचे चित्र रेखाटून तुमचा पक्षी उडाला, असा संदेश कुटुंबास दिला आहे.