मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा बरसण्याची शक्यता आहे. कारण राज्यात परतीच्या मान्सूनसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यानुसार आज राज्यातील विविध भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.
आज हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला वगळता इतर जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाची आत्महत्या ; मनोरंजन सृष्टी पुन्हा हादरली
शिंदे यांच्या मेळाव्यात भाजपमध्ये अंतर का निर्माण झाले? हे मोठे कारण पुढे आले
प्रगत संगणन विकास केंद्रात बंपर भरती ; तब्बल 2 लाखाहून अधिक पगार मिळेल
रुग्णवाहिकेला तीन कारची धडक, 5 ठार ; अपघाताचा थरारक CCTV कॅमेऱ्यात कैद
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.