नवी दिल्ली : सणासुदीला सुरुवात झाली आहे. या हंगामात सोन्या-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र याच दरम्यान सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. या वेळी दिवाळीत सोने महाग होऊ शकते. मात्र जाणकारांच्या मते दिवाळीत सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते. पण, एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती सुरुवातीच्या व्यापारात 0.44 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होत असून वायदे बाजारात 1.24 टक्क्यांनी उसळी घेतली आहे.
एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या
MCX वर आज सकाळी 9.30 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 229 रुपयांनी वाढून 51,875 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा दर 753 रुपयांनी वाढून 61,520 रुपये प्रति किलो झाला. वास्तविक, आज सोन्याचा भाव 51,836 रुपयांवर उघडला होता, परंतु काही काळानंतर तो 51,875 रुपयांवर आला, तर चांदीचा भाव आज 61,100 रुपयांवर सुरू झाला.
आज आंतरराष्ट्रीय बाजारात काय परिस्थिती आहे?
आता जागतिक बाजाराबाबत बोलूया, गेल्या आठवडाभरापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ आज थांबली. आज सोन्याची स्पॉट किंमत 0.22 टक्क्यांनी घसरून 1,719.53 डॉलर प्रति औंस झाली आहे, तर चांदीची स्पॉट किंमत 1.14 टक्क्यांनी घसरून 20.78 डॉलर प्रति औंस झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे.