मुंबई : जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने भारतात बनवल्या जाणाऱ्या कफ सिरपवरुन एक महत्त्वाचा अलर्ट जारी केलाय. भारतातील मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड या कंपनीकडून बनवण्यात आलेल्या सर्दी-खोकला आणि तापावरील सिरपवरुन हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सर्दी-खोकला किंवा ताप आल्यानंतर लहान मुलांना एक सिरप देण्यात आलं होतं. यामुळे गांबिया नावाच्या देशात 66 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आलीय. या सिरपमध्ये असलेले काही घटक हे लहान मुलांच्या शरीरासाठी घातक होते. या कफ सिरपमुळे चिमुरड्यांच्या कीडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा :
शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ; जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी
प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाची आत्महत्या ; मनोरंजन सृष्टी पुन्हा हादरली
शिंदे यांच्या मेळाव्यात भाजपमध्ये अंतर का निर्माण झाले? हे मोठे कारण पुढे आले
प्रगत संगणन विकास केंद्रात बंपर भरती ; तब्बल 2 लाखाहून अधिक पगार मिळेल
इतर देशांना अलर्ट
“भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडद्वारे खोकला आणि सर्दी सिरप ही चार औषधे तयार करण्यात आली आहेत. WHO भारतातील संबंधित कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसह पुढील तपास करत आहे. दूषित उत्पादने आतापर्यंत फक्त गॅम्बियामध्ये आढळली आहेत, ती इतर देशांमध्ये वितरित केली गेली असतील. डब्ल्यूएचओ सर्व देशांतील रूग्णांनाचे आणखी नुकसान टाळण्यासाठी ही उत्पादने शोधून ती नष्ट करण्याची शिफारस करतो, असे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी म्हटले आहे.