मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्रीने हॉटेलच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याने मनोरंजन सृष्टी हादरुन गेले होते. त्यानंतर आता पुन्हा एका प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत सर्वांना हादरवून सोडलं आहे.
प्रसिद्ध तामिळ अभिनेता-दिग्दर्शक लोकेश राजेंद्रनने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. अवघ्या 34व्या वर्षी या टीव्ही अभिनेत्याने टोकाचं पाऊल उचललल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या वृत्तानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लोकेश आणि पत्नीत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकेश राजेंद्रनचं लग्न झालं होतं. आणि त्याला दोन मुलेदेखील आहेत. अभिनेत्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळजवळ एका महिन्यापूर्वी त्यांना समजलं होतं की, लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये काहीतरी वाद सुरु आहे.चार दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची कायदेशीर नोटीस पाठवली होती. तो या सर्व गोष्टींमुळे प्रचंड तणावात होता. आपण लोकेशला शुक्रवारी शेवटचं पाहिलं असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. त्याने आपल्याला काही पैशांची गेज असल्याचं सांगत वडिलांजवळून काही पैसे घेतले होते.
हे पण वाचा :
शिंदे यांच्या मेळाव्यात भाजपमध्ये अंतर का निर्माण झाले? हे मोठे कारण पुढे आले
प्रगत संगणन विकास केंद्रात बंपर भरती ; तब्बल 2 लाखाहून अधिक पगार मिळेल
रुग्णवाहिकेला तीन कारची धडक, 5 ठार ; अपघाताचा थरारक CCTV कॅमेऱ्यात कैद
चेक बाऊन्स प्रकरणात कठोरतेसाठी येणार नवीन नियम, खात्यातून पैसे काढता येणार नाहीत!
याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, वैवाहिक आयुष्यात सुरु असलेल्या चढ-उतारांमुळे लोकेश प्रचंड तणावात होता. यातूनच त्याला मद्यपान करण्याची सवय जडली होती. तो दररोज मद्य प्राशन करु लागला होता. त्यातच तो दररोज चेन्नई मुफस्सल टर्मिनलझोपलेला दिसून येत असे. या अभिनेत्याच्या वडिलांच्या मते, या अभिनेत्याने जवळजवळ 150मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नव्हे तर लोकेशने सुपरस्टार प्रभू, विजयकांत यांच्यासोबत चित्रपटातसुद्धा काम केलं आहे.