बीड,(प्रतिनिधी)- बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून पोटची मुलगी अपंग असल्याचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच १० वर्षीय चिमुकल्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ५५ वर्षीय जन्मदात्या बापानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड येथील रेवकी देवकी गावात घडली आहे.
पीडित मुलगी अपंग…
रतन गोरे वय ५५ ,रा .रेवकी देवकी असे नराधम आरोपी बापाचे नाव आहे. आरोपी रतन गोरे याने, काल दुपारी आपल्या राहत्या घरी, पोटच्या अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार केला. काल सायंकाळच्या दरम्यान ही घटना समोर आली आहे.
पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु
दरम्यान, पीडितेवर सुरुवातीला गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र पीडितेची प्रकृती नाजूक असल्याने तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरु आहे.याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
भुकंपाच्या १०० धक्क्यांनी तैवान हादरले ; रेल्वेचे डबे घसरले, बिल्डिंग कोलमडल्या, जमिनीला गेले तडे ; सर्व व्हिडीओ पहा
गेल्या २४ तासांत तैवानला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. भुकंपाच्या १०० धक्क्यांनी तैवान हादरले आहे. आज(रविवार) 7.2 रिश्टर स्केल तर शनिवारी 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. तैवानमधील युजिंग भागात मागील २४ तासांत भूकंपाचे धक्के जाणवत आहे.या भूकंपाशी संबंधित विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात भूकंपाने कोणत्या प्रकारची नासधूस केली आहे हे लक्षात येतं.
रेल्वेचे डबे घसरले… भीतीचे वातावरण…
भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय भूकंपामुळे रेल्वेचे काही डबे उलटल्याची घटनाही समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून येथे सातत्याने भूकंपाचे धक्के येत आहेत. 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप युजिंगपासून 85 किमी पूर्वेला दुपारी 12:14 वाजता झाला.भूकंपाची त्रिज्या सुमारे 10 किमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पूर्व तैवानमधील डोंगली स्टेशनवर ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले. मात्र, यात कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. त्याच वेळी, सुमारे 600 लोक सिनिक चीक आणि लियुशिशी पर्वतीय भागात अडकले आहेत.
नोकरीच्या बातम्या वाचा….क्लिक करा…