मुंबई : भाजप पदाधिकाऱ्याविरोधात अत्याचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
काशिमिरा पोलिस ठाण्यात २५ वर्षीय पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत तिने म्हटले आहे की, भाजपचे पदाधिकारी नवीन सिंग याच्यासोबत सन २०२१मध्ये फेसबुकवर तिची ओळख झाली. पतीसोबत वाद होत असल्याने लहान मुलींसोबत आपण वेगळे राहत असल्याचे पीडितेने सिंग यांना सांगितले होते. त्यावर आपल्याला नोकरी देतो असे सांगून सिंग यांनी मिरा रोडमध्ये एक खोलीही भाड्याने दिली होती. नगरसेवक पदाची निवडणूक आपण लढणार असल्याने, त्यानंतर आपण लग्न करू, असे आमिष दाखवत सिंग याने आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
हे पण वाचा..
अखेर ‘त्या’ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘एलसीबी’चे पो.नि. किरणकुमार बकाले यांचं निलंबन
एलसीबीच्या निरिक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली ; नेमकं काय आहे कारण?
या लोकांनी मूग डाळ खाऊ नये, अन्यथा आरोग्याला पोहोचेल हानी
दरम्यान, मधल्या काळात पीडित गर्भवतीदेखील होती. मात्र सिंग याच्या सांगण्यावरून तिने गर्भपात केला होता. सिंग यांनी पीडितेला शिवीगाळ करत तिचे खासगी फोटो परिचित व्यक्तीला पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली होती. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित महिलेने अखेर काशिमिरा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावरून बलात्कारासह विविध कलमांतर्गत काशिमिरा पोलिसांनी सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.