गेल्या २४ तासांत तैवानला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. भुकंपाच्या १०० धक्क्यांनी तैवान हादरले आहे. आज(रविवार) 7.2 रिश्टर स्केल तर शनिवारी 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. तैवानमधील युजिंग भागात मागील २४ तासांत भूकंपाचे धक्के जाणवत आहे.या भूकंपाशी संबंधित विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात भूकंपाने कोणत्या प्रकारची नासधूस केली आहे हे लक्षात येतं.
A bridge collapsed in #Taiwan after an #earthquake.pic.twitter.com/dSZKVAtOi3
— CN Wire (@Sino_Market) September 18, 2022
रेल्वेचे डबे घसरले… भीतीचे वातावरण…
भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय भूकंपामुळे रेल्वेचे काही डबे उलटल्याची घटनाही समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून येथे सातत्याने भूकंपाचे धक्के येत आहेत. 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप युजिंगपासून 85 किमी पूर्वेला दुपारी 12:14 वाजता झाला.भूकंपाची त्रिज्या सुमारे 10 किमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पूर्व तैवानमधील डोंगली स्टेशनवर ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले. मात्र, यात कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. त्याच वेळी, सुमारे 600 लोक सिनिक चीक आणि लियुशिशी पर्वतीय भागात अडकले आहेत.
An earthquake of magnitude 7.2 hit off the coast of Taiwan#Taiwan #earthquake #台湾地震 #臺灣 #地震 #台湾 pic.twitter.com/XS0p2iES4z
— News Update (@ChaudharyParvez) September 18, 2022
Rocks and trees falling down on a mountain road in #Taiwan after the M 6.9 #earthquake. pic.twitter.com/6eIlFL1XI7
— Frank Hoogerbeets (@hogrbe) September 18, 2022
नोकरीच्या बातम्या वाचा….क्लिक करा…