नवी दिल्ली : मेघालय भाजपचे उपाध्यक्ष बर्नार्ड एन मारक यांना उत्तर प्रदेशातील हापूर येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्या फार्महाऊसमध्ये वेश्या व्यवसाय चालवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर आता पोलीस तपासात पुढे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बर्नार्ड एन मारक यांच्या फार्महाऊसमधून आधी कंडोम सापडली होती. त्यानंतर आता तपासात आणखी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मारक यांना अटक करून पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील तुरा इथे आणण्यात आले. पोलिसांनी मारकविरुद्ध स्फोटक पदार्थ कायदा आणि पॉक्सो कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.
मारक हा माजी अतिरेकी नेता आहे. २२ जुलै रोजी पोलिसांनी मारक यांच्या फार्महाऊसवर छापा टाकला. तेव्हापासून मारक फरार होता. या प्रकरणी पोलिसांनी ७३ जणांना अटक केली तर ६ अल्पवयीन मुलांची (चार मुले आणि २ मुली) सुटका करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
धक्कादायक : कारमध्ये अल्पवयीन मुलीवर 7 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार
लग्नानंतर शून्य रिस्कवर उघडा ‘हे’ खाते! दरमहा मिळतील 4950 रुपये
‘या’ कारणामुळे गिरीश महाजनांनी घेतली अमित शहांची भेट
क्या बात है : दहावी उत्तीर्णांना परीक्षा न देता मिळेल नोकरी, असा करा अर्ज