मुंबई : राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन होऊन एक महिना उलट त्याला तरी या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते बुधवारी दिल्लीला जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र अचानक हा दौरा रद्द झाला. गृहमंत्री अमित शहा यांचा भेटीसाठी वेळ मिळत नसल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. यातच माजी मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी अमित शहांना भेट घेतली आहे.
त्यामुळे सहाजिकच अमित शाह गिरीश महाजन यांच्या भेटीत शिजलं काय? अस सवाल, राज्याच्या राजकारणात उपस्थित झाला आहे. मात्र, विविध विषयांवर मुख्यतः नाशिक व जळगाव जिल्ह्यातील विषयांवर चर्चा केली” अशी माहिती खुद्द गिरीश महाजन यांनी दिली. शाहांसोबत भेटीचा फोटो ट्वीट करत महाजनांनी चर्चेचा तपशील सांगितला.
केंद्रीय गृहमंत्री मा.श्री.अमित शहा जी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली.. विविध विषयांवर मुख्यतः नाशिक व जळगाव जिल्ह्यातील विषयांवर चर्चा केली!@AmitShah pic.twitter.com/vo9hMSbt2h
— Girish Mahajan (@girishdmahajan) July 28, 2022
अमित शाह यांच्याकडे सहकार खाते आहे. नुकतंच राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ राज्य सरकारने बरखास्त केलं. तिथे भाजपचे आमदार आणि गिरीश महाजन यांचे समर्थक मंगेश चव्हाण यांना प्रशासक मंडळाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. याबाबत गिरीश महाजनांनी शाहांना माहिती दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.