वरणगाव (अंकुश गायकवाड)महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या सुचनांव्ये व अध्यक्ष जळगांव जिल्हा कांग्रेस कमेटीच्या निदर्शनानुसार तालुका सार्वजनिक वितरण (रेशनिंग) कमेटी गठीत केली असून समिती सदस्यांनी कोविड-19 च्या पाश्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या रेशनिंग विषयी तक्रारीचे निवारण करण्यासाठी काम करावयाचे आहे. त्याबाबत प्रशासन व नागरिकाशी समन्वय साधून यासंकट काळी कांग्रेस पक्ष आपल्या पाठीमागे असून सर्वं पदाधिकारी सामन्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी ही कमिटी गठित करण्यात आल्याची माहिती तालुका अध्यक्ष नानेश्वर पाटील यांनी दैनिक नजरकैद शी बोलतांना सांगितले.