Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिलेच नव्हते

najarkaid by najarkaid
October 29, 2019
in राज्य, राजकारण
0
शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिलेच नव्हते
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: भारतीय जनता पक्षाने ५०-५० च्या फॉर्म्युल्याचे वचन देत शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले असून आपल्या वचनाला भाजपने जागावे असे शिवसेनेकडून सतत बोलले जात असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र असे वचन दिले नसल्याचे स्पष्ट करत खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेला ५०-५०च्या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असे आश्वासन भारतीय जनतापक्षाने कधीन दिलेले नव्हते, अशा स्पष्ट शब्दांत फडणवीस यांनी म्हटले आहे. आपण स्वत: अमित शहा यांना फोन करून असे आश्वासन शिवसेनेला दिले का, असे विचारले असता, शहा यांनी आपण असे आश्वासन शिवसेनला दिले नसल्याचे शहा यांनी म्हटल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे भाजप-शिवसेनेच्या संबंधांमधील दरी आणखी वाढली असून आता शिवेसनेची प्रतिक्रिया काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यात महायुतीचेच सरकार येईल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
आता फक्त उद्धव ठाकरे हेच बोलतील’

वाटाघाटीदरम्यान शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असे आश्वासन भाजपने शिवेसनेला दिलेच नव्हते, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मात्र तूर्तास प्रतिक्रिया देण्याचे टाळत सावध भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यावर फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच बोलतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
 तर भाजपवरचा विश्वास उडेल’
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेला जे आश्वासन दिले होते, ते पाळणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा भारतीय जनता पक्षावरील विश्वास उडेल, असे वक्तव्य शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. शिवसेना-भाजप हे एक कुटुंब असून भाजप मात्र कुटुंबासारखे वागत नाही, मात्र दोघांनी एकत्र राहणे यातच राज्याचे कल्याण आहे असेही केसरकर म्हणाले. भाजप आश्वासनानुसार वागला नाही, तर देशात चुकीचा संदेश जाईल, असेही केसरकर म्हणाले.
अमित शहांचा मुंबईदौरा रद्द
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे उद्या मुंबईत येणार होते. शहा मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार होते. या भेटीत भाजप-शिवसेनेदरम्यान सुरू झालेला सत्तास्थापनेचा पेच सुटेल असे म्हटले जात होते. मात्र अमित शहा यांनी आपला मुंबई दौरा रद्द केला आहे. यामुळे तूर्तास शहा-ठाकरे भेट टळली असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले नव्हते असे खळबळजनक वक्तव्यानंतर अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द झाल्याचे वृत्त आल्याने भाजप-शिवसेनेदरम्यानचे संबंध अधिक ताणले गेल्याचे संकेत मिळत आहेत.
आज संध्याकाळ नंतर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची बैठक?

दरम्यान, आज संध्याकाळी उशिरा भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. या संभाव्य बैठकीत सत्तेचा फॉर्म्युल्यावर चर्चा होईल असे सांगितले जात आहे. मात्र दोन पक्षांदरम्यान अशी बैठक होत आहे, असे भाजप किंवा शिवसेनेकडून अधिकृतपणे अद्याप सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, उद्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी भाजपने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीतही भाजप-सेनेच्या संबंध नेमके कोणत्या दिशेने जाणार, याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुती सरकारचा शपथविधीचा ठरला मुहूर्त ?

Next Post

न्यायमूर्ती बोबडे भारताचे नवे सरन्यायाधीश; नियुक्तीपत्रावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
न्यायमूर्ती बोबडे भारताचे नवे सरन्यायाधीश; नियुक्तीपत्रावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

न्यायमूर्ती बोबडे भारताचे नवे सरन्यायाधीश; नियुक्तीपत्रावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us