Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात १ जुलैपासून ‘कृषी संजीवनी सप्ताह’

najarkaid by najarkaid
June 26, 2020
in राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. २६: राज्यात कृषि दिनानिमित्त ‘कृषी संजीवनी सप्ताह’ साजरा करण्यात असून याकाळात कृषिमंत्र्यांसह अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनविन तंत्रज्ञाना विषयी मार्गदर्शन करतील. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसुत्रीचा अवलंब करीत दि.१ ते ७ जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दि. १ जुलै रोजी कृषिदिन साजरा केला जातो. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सप्ताहात घ्यावयाच्या कार्यक्रमांबाबत नियोजन करण्यासाठी काल कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
कृषी तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते त्यासाठी कृषि विभागातील अधिकारी – कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि कृषि विस्तार यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत कृषि विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्था यांनी संशोधीत केलेल्या अद्ययावत कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. त्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश कृषिमंत्री श्री. भुसे यांनी दिले आहेत.
या सप्ताहांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दररोज किमान एका गावातील तर उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे आहे, असे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.
या सप्ताहामध्ये गावात बैठक आयोजित करतानाच शेतकऱ्यांनी राबविलेल्या कृषिविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांना देखील भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. एम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी मोहिम हाती घ्यावी. पुरस्कारप्राप्त शेतकरी, प्रयोगशील शेतकरी तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांचे तालुकास्तरीय कार्यक्रमात व्याख्यान आयोजित करावे, कृषि विषयक योजना, पतपुरवठा याबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणिवजागृती मोहिम हाती घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

Next Post

कोरोनाच्या युद्धात फ्रंटलाईनवर लढताना जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा !

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
कोविडसंदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८९ हजार पास वाटप

कोरोनाच्या युद्धात फ्रंटलाईनवर लढताना जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा !

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us