Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजभवन परिसर आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांनी उजळणार

najarkaid by najarkaid
November 12, 2020
in राज्य
0
राजभवन परिसर आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांनी उजळणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. 12 : या दिवाळीत राज्यपालांचे निवासस्थान असलेला राजभवन परिसर पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांनी उजळणार आहे.

स्थानिक स्वदेशी उत्पादनांना मदत करण्याच्या हेतूने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनातील कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त मिठाईसह बांबूपासून आदिवासी महिलांनी तयार केलेले पर्यावरण-स्नेही आकाशकंदील भेट दिले.

राजभवन येथील स्थायी कर्मचारी राजभवन सुंदर व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडतात, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी पालघर जिल्ह्यातील भालिवली येथील विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या बांबू प्रकल्पाला भेट दिली होती. त्या ठिकाणी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आदिवासी महिलांना त्यांनी प्रमाणपत्रे दिली होती. अधिकाधिक लोकांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेली उत्पादने विकत घ्यावी असे आवाहन करताना आपण राजभवनापासून याची सुरुवात करू असे कोश्यारी यांनी सांगितले होते.

त्यानुसार विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील भालिवली, बोट, दुर्वेश व गोजे येथील आदिवासी महिलांनी आकाशकंदील तयार करून राजभवन येथे पाठविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक व प्रदुषणरहित साजरी करावी, असे आवाहन राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी केले आहे.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव प्राची जांभेकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करण्याचे निर्देश

Next Post

महिलांना भयमुक्त, भीतीमुक्त महाराष्ट्राची भेट मुख्यमंत्री देणार का? ; भाजपा उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांचा सवाल

Related Posts

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

April 10, 2026
Next Post
महिलांना भयमुक्त, भीतीमुक्त महाराष्ट्राची  भेट मुख्यमंत्री देणार का? ; भाजपा उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांचा सवाल

महिलांना भयमुक्त, भीतीमुक्त महाराष्ट्राची भेट मुख्यमंत्री देणार का? ; भाजपा उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांचा सवाल

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us