Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदींचे सरकार हे फक्त आश्वासनांचे सरकार – रोहिणी खडसे

महाविकास आघाडीच्या प्रचारात रोहिणी खडसे सक्रिय; कुऱ्हा वढोदा जि.प.गटातून प्रचाराची सुरुवात

najarkaid by najarkaid
April 20, 2024
in Uncategorized
0
मोदींचे सरकार हे फक्त आश्वासनांचे सरकार –  रोहिणी खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या आजच्या प्रचाराची सुरुवात मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा वढोदा जि प गटातून करण्यात आली.

पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणीताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रारंभी कुऱ्हा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना उपस्थित पदाधिकऱ्यांनी माल्यार्पण , अभिवादन करून प्रचारास सुरुवात करण्यात आली.

यावेळी ॲड. खडसे म्हणाल्या, ‘सत्ताधाऱ्यांच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे.सत्ताधाऱ्यांनी वाढती महागाई, बेरोजगारी,शेतकऱ्यांना प्रश्न सर्व बाबतीत दिलेले आश्वासने फोल ठरले असुन मोदींचे सरकार हे फक्त आश्वासनांचे सरकार आहे. मोदींजींनी पेट्रोल, गॅसचे भाव कमी करण्याचे दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. यापैकी एकही आश्वासन पुर्ण झाले नसून गॅस पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे, रोजगार नसल्यामुळे तरुण वर्ग हतबल झाला आहे, एकीकडे शेतमालाला भाव नाही तर, दुसरीकडे खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाना शेती कशी कसावी? असा प्रश्न पडला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हे चित्र बदलवण्याची वेळ आता आली असुन यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना विजयी करावे.’

डॉ जगदीश पाटील यांनी केंद्र व राज्यातील महायुतीच्या सरकारच्या धोरणांवर प्रहार करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले. यावेळी उमेदवार श्रीराम पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यु डी पाटील, भा रा काँग्रेस ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, भा रा काँ तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, माजी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, विकास पाटिल, सरपंच डॉ बि सी महाजन, तालुका सरचिटणीस रविंद्र दांडगे, दिपक पाटील, युवक तालुका अध्यक्ष मुन्ना बोडे, शिवा पाटील, प्रविण कांडेलकर, छायाताई सवळे, रंजनाताई कोथळकर, माणिक पाटील, संतोष कांडेलकर, वसंता पाटील, संदीप पाटील, संदीप ढिवरे, शंकर मोरे, मयुर साठे, कचरू बढे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुऱ्हाकाकोडा येथे मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांसाठी उद्द्योग उभे करणार : श्रीराम पाटील

Next Post

जुमलेबाजांना संधी दिली, आता काम करणाऱ्यांना संधी द्या!

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
जुमलेबाजांना संधी दिली, आता काम करणाऱ्यांना संधी द्या!

जुमलेबाजांना संधी दिली, आता काम करणाऱ्यांना संधी द्या!

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us