Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातही केजरीवाल पॅटर्न; लवकरच मोफत वीज?

najarkaid by najarkaid
February 8, 2020
in राज्य, राजकारण
0
महाराष्ट्रातही केजरीवाल पॅटर्न; लवकरच मोफत वीज?
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दरमहा शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीजपुर‌ठा करण्याच्या योजनेवर राज्य सरकार विचार करीत आहे. मात्र, या योजनेसाठी दरवर्षी सुमारे ७ हजार १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ‘महावितरण’ आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती पाहता हा भार कोण सोसू शकणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात  मोफत वीजपुर‌ठा  मिळणार, की हे नवे ‘गाजर’च ठरणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

दिल्लीची विधानसभा नि‌वडणूक सध्या देशभरात चर्चेत असून, त्यानिमित्ताने आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीत राबविलेल्या विविध योजनाही आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत. त्यामध्ये तेथील मोफत वीज योजनेचाही समावेश आहे. दिल्लीत दरमहा दोनशे युनिट पर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज पुरविण्यात येते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही शंभर युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांना मोफत वीज पुरविण्याची योजना राज्य सरकारच्या विचाराधिन असल्याची माहिती उर्जामंत्री यांनी दिली आहे. याबाबत ग्राहक संघटनांशी चर्चा झाली असून, येत्या वर्षाअखेरपर्यंत ही योजना लागू करण्याचा मानसही उर्जामंत्र्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, दिल्लीसारख्या छोट्या आणि प्रामुख्याने शहरी लोकवस्ती असलेल्या राज्याची महाराष्ट्रासारख्या राज्याशी तुलना करता, महाराष्ट्रात ही योजना लागू करणे मोठे आव्हान ठरणार आहे.

राज्यात शंभर युनिटपर्यंत दरमहा वीज वापरणारे सुमारे एक कोटी ४० लाख घरगुती ग्राहक आहेत. त्यांना मोफत वीज द्यायची असेल, तर ‘महावितरण’ला दरवर्षी सुमारे सात हजार १०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा भार सोसण्याची ‘महावितरण’ची आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे या मोफत विजेपोटी राज्य सरकारला दरवर्षी ही रक्कम अनुदान म्हणून ‘महावितरण’ला देण्याचा पर्याय आहे. त्यातही कायद्यातील तरतुदींनुसार ही रक्कम ‘महावितरण’ला आगाऊ द्यावी लागणार आहे, याकडे उर्जा क्षेत्रातील अभ्यासकांनी लक्ष वेधले. मात्र, राज्य सरकारच्या तिजोरीतही सध्या खडखडाट असून दुष्काळ, पीक कर्जमाफी आणि करांचे घटलेले उत्पन्न पाहता हा खर्च कोठून भरून काढणार, असा प्रश्न उभा राहणार आहे.

दिल्लीमध्ये दरमहा दोनशे युनिटपर्यंत वीज वापरणारे सुमारे ४९ लाख ग्राहक (एकूणात ३३%)असून, त्यापोटी सुमारे दोन हजार कोटी रुपये इतका खर्च येतो. त्या तुलनेत महाराष्ट्रातील एकूण अडीच कोटी वीज ग्राहकांपैकी सुमारे एक कोटी ९५ लाख घरगुती वीजग्राहक (एकूणात ७२%) आहेत. त्यातील एक कोटी ४० लाख ग्राहकांचा वीजवापर दरमहा शंभर युनिटपर्यंत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दानवेंचे जावई मनसेत; चंद्रकांत खैरेंवर डागली तोफ

Next Post

टीमवर्क हीच मॅनेजमेंट क्षेत्रातील “सक्सेस कि “- निलांबरी जोशी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
टीमवर्क हीच मॅनेजमेंट क्षेत्रातील “सक्सेस कि “- निलांबरी जोशी

टीमवर्क हीच मॅनेजमेंट क्षेत्रातील "सक्सेस कि "- निलांबरी जोशी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us