Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महामंडळाचा सर्व्हर हॅक झाल्यामुळे उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण

राज्यातील उद्योजकांच्या मनातील शंकांचे निरसन करा भाजपा प्रदेश उद्योग व आयटी आघाडीची मागणी

najarkaid by najarkaid
April 6, 2021
in राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सर्व्हर हॅक झाल्यामुळे उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांनी उद्योजकांना आश्वस्त करण्याची गरज आहे , असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उद्योग आघाडी प्रमुख प्रदीप पेशकार व आयटी सेल प्रमुख सतीश निकम यांनी सोमवारी केली .

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यावेळी उपस्थित होते.

श्री . निकम म्हणाले की , सर्व्हर हॅक होण्याची घटना 21 मार्च रोजी पहाटे अडीच वाजता घडली. मात्र या बाबतची तक्रार 1 एप्रिल 2021 रोजी सायबर सेलकडे नोंदविण्यात आली . एफआयआर नोंदविण्यात 10 दिवस उशीर का झाला ? एमआयडीसी या कडून हॅकर्सशी बोलणी चालू होती , असे सांगण्यात आले. या वाटाघाटीत भाग घेण्यासाठी कोणाला अधिकृतपणे सांगण्यात आले होते , याचा खुलासा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून झाला पाहिजे. भारताची ओळख जगातील आयटी महासत्ता असल्याचे मानले जाते.आमच्याकडे आयटी उद्योगातील सर्व प्रकारचे तज्ज्ञ आहेत.

आज आम्ही तंत्रज्ञानामध्ये जगाला मार्गदर्शन करीत आहोत.हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमआयडीसीने या तज्ज्ञांची मदत का घेतली नाही , याचाही सरकारने खुलासा करावा . या प्रक्रियेत केंद्र सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सींचा सहभाग का नव्हता याबद्दलही राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे.

एमआयडीसी कडे प्रत्येक उद्योगाचा तपशील, व्यवसाय योजना, वित्तीय, बँक तपशील, इमारतीच्या योजना वगैरे बारीकसारीक माहिती असते. ही माहिती हॅकर्स च्या हातात लागली आहे का या शंकेने उद्योग जगतात कमालीची अस्वस्थता आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अंबालागान यांनी आपल्या निवेदनात डेटा परत मिळाल्याचे नमूद केले आहे.पण एनक्रिप्टेड डेटाचे काय? आम्ही व आमचे व्यवसाय सुरक्षित आहेत ना अशी शंका उद्योजकांच्या मनात आहे , याचे निरसन करण्यासाठी सरकारकडून अद्याप काहीच पावले टाकण्यात आलेली नाहीत , असे श्री . पेशकार यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यात सिस्टम हॅक होण्याची ही दुसरी घटना आहे.

अशा घटनांमुळे महाराष्ट्रात येण्यास उद्योजक तयार होणार नाहीत , असेही श्री. निकम व पेशकार यांनी निदर्शनास आणून दिले.

Spread the love
Tags: #bjp
ADVERTISEMENT
Previous Post

विलास ताठे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

Next Post

‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात सुधारणा; आणखी आवश्यक सेवांचा समावेश

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राज्यातील या ‘तीन’ जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतांना दिसतोय

‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात सुधारणा; आणखी आवश्यक सेवांचा समावेश

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us