Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहिल्याच दिवशी ८० दिव्यांगांची तपासणी ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात सुविधेला सुरुवात

najarkaid by najarkaid
December 23, 2020
in जळगाव
0
पहिल्याच दिवशी ८० दिव्यांगांची तपासणी ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात सुविधेला सुरुवात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार २३ डिसेंबरपासून तब्बल ८ महिन्यानंतर कोरोनामुळे थांबलेले दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज अखेर सुरु झाले. दिव्यांग मंडळात पहिल्याच दिवशी सुमारे ८० लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार दि. २३ डिसेंबर २०२० पासून दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे.
दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली. सकाळी ८ वाजेपासून नाव नोंदणी करण्यासाठी दिव्यांग बांधवानी उपस्थिती दिली होती. त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी १० ते १ वाजेदरम्यान करण्यात आली.

सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत पहिल्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात झाली. तपासणीसाठी कुठलीही फी आकारली जात नाही. पहिल्या दिवशी अस्थिव्यंग, नाक-कान, मानसिक व इतर प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या सुमारे ८० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

यावेळी उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे समन्वयक डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्यासह तज्ज्ञ डॉ. आस्था गनेरीवाल, डॉ. सचिन अहिरे, डॉ. विजय कुरकुरे, डॉ. स्वप्नील कळसकर, डॉ. दिलीप महाजन, डॉ. अक्षय सरोदे, डॉ.प्रसन्न पाटील यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी गोपाल सोळंके, चेतन निकम, दत्तात्रय पवार यांनी सहकार्य केले.

दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर बुधवारी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.

येथील प्रक्रिया झाल्यावर प्रमाणपत्र घरपोच तसेच पुढील आठ दिवसात (www.swavlambancard.in) या संकेतस्थळावरून प्रिंट काढून लाभार्थ्याला मिळू शकणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ख्रिसमस व नववर्षे स्वागतासाठी जळगाव महापालिका हद्दीत ‘या’ वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी

Next Post

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे रुग्णांना मिळतोय आधार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us